(5 / 12)कर्क: आज चंद्राचं गुरूच्या राशीतुन होणारं भ्रमण आपल्या व्यक्तीत्वामध्ये सुधारणा करावी असे सारखे वाटत राहील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. शासकीय सेवेतील मंडळीना देखील उत्तम दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदन मिळेल. दुसर्याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. विरोधक आक्रमक होतील त्यांचा वेळीच बिमोड कराल तर यशस्वी व्हाल. शुभरंग: पांढरा, शुभदिशा: वायव्य.शुभअंकः ०२, ०७.