(2 / 13)मेषः आज आपला प्रभाव वाढणार आहे. रोजगारात नवीन कामाची आखणी कराल. आपल्या बोलण्यामुळे गैरसमज होत नाहीत ना याचा विचार करून संवाद साधावा. कलाकरांना संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील. भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील .सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. शासकीय पोलिस यंत्रणेतील व्यक्तींना उत्तम दिनमान आहे. व्यापार व्यवसायात तेजी राहील. एकत्रित सहलीचे नियोजन कराल. मुलांच्या हट्टापायी चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल. समाजात केलेल्या कार्याची स्तुती होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.शुभरंगं: तांबूस शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०७, ०९.