(2 / 13)मेषः आज चंद्राचं बुधाच्या नक्षत्रातुन होत असणार भ्रमण पाहता तुमच्या हजरजबाबी स्वभावामुळे लोकांवर प्रभाव पाडाल. राजकारणी लोक आपला मुत्सद्दीपणा दाखवतील. भक्तिमार्गाकडे वळाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. नोकरी व्यवसायात तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. एखादे काम धाडसाने करण्यात तुमचा पुढाकार असेल. इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. आपले विचार योग्य ठेवा. नोकरी रोजगारात प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मित्र आणि शुभचिंतक याच्या माध्यमातून आपल्या समस्या दूर होण्यास मदत होईल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहिल.नोकरीत प्रगती होण्याचे संकेत मिळतील. मोठ्या तसेच प्रतिष्ठित लोकांशी संबंध वाढतील. कुटुंबातील सदस्याची प्रगती होईल. विचारपूर्वक कामे केली तर आजचा दिवस चांगला जाईल. शुभरंग: नांरगी शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०१, ०९.