(2 / 13)मेष: आज चंद्र-गुरू-हर्षल प्रतियोगात तुमची बौद्धिक क्षमता सिद्ध कराल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने एखादी आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला मानलात तर फायद्याचे ठरणार आहे. जोडीदाराचे सहकार्य उत्तम राहील. नोकरी व्यवसायात हव्या असलेल्या संधी मिळतील. कलेच्या आणि संगणक क्षेत्रात असणाऱ्यांनी येणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा. आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. मित्र मैत्रिणींकडून चांगली साथ लाभेल यात शंका वाटते. नवनविन प्रलोभने येत राहतील. आपली मानसिकेला विचलित करणाऱ्या घटना घडतीत. व्यापारात काळजी पूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. मोठ्या सांपत्तिक उलाढालीत आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.शुभरंगः नांरगी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०१, ०५.