(2 / 13)मेष: आज चंद्र-प्लुटो योगात स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात कामगारांना कितीही सवलती दिल्या तरी त्यांच्या त्रासापासून सुटका मिळणार नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मनातील काहीही हातचे राखून न ठेवता मोकळ्या निर्भिड स्वभावाबद्दल तुम्ही प्रसिद्ध व्हाल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाच्या क्षेत्रात करियर करणारांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कष्टाने ध्येयपूर्ती होईल. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. शुभरंगः नारंगी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०१, ०८.