(9 / 13)वृश्चिकः आज ग्रहयोग अनुकूल राहतील. मनाविरुद्ध जर काही घडले तर सकारात्मक विचारामुळे उत्साह वाढेल. वैवाहिक जीवनात तर याचे महत्त्व फारच राहील. फायदेशीर व्यवहार करता येतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. तुमच्या कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. तसेच, दुसऱ्यांना मदत करताना सावधगिरी बाळगा. अर्थिक व्यवहार करताना गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. त्यांची प्रगती उल्लेखनीय असेल.शुभरंग: भगवा शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०४, ०८.