(2 / 12)मेष: आज अशुभ स्थानातील चंद्रभ्रमणात दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. घरातील खर्च अपरिहार्य कारणामुळे वाढतील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. नोकरी निमित्त घराबाहेर रहाण्याचे योग येतील. दुसऱ्यांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही. तुमच्या लहरी स्वभावाला इतरांना तोंड द्यावे लागणार आहे. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोष जनक वातावरण राहिल. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका. शुभरंग: केशरी शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०१, ०९.