(2 / 13)मेष: आज प्रतिकूल ग्रहमान असल्याने परदेशगमना साठी अडचणी उद्भवतील. नोकरी व्यवसायात तुमच्या समोरचा माणूसही तेवढाच तुल्यबळ असल्यामुळे मनाविरुद्ध माघारही घ्यावी लागेल. मुलांमध्ये चिकाटी आणि निग्रही वृत्तीचा अभाव दिसल्यामुळे त्यांना योग्यवेळी समज द्यावी लागेल. आत्मप्रौढी आणि अहंकाराच्या मागे न लागता कर्तव्याशी प्रामाणिक राहा. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्याला मिळेल असी स्थिती आहे. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. नोकरीत वरिष्ठ सदस्यांसोबत विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. शुभरंग: केशरी शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०१, ०८.