(2 / 13)मेषः आज गुरू प्रतिपदेचा चंद्र आपणासाठी शुभ फलदायी ठरेल. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासा मध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष घालावे लागेल. अती संवेदनशील असल्यामुळेच थोडा तापट पणाही वाढेल. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढीस लागेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगती कारक दिनमान आहे. आपला नावलौकिक वाढेल. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. अंगीभूत गुणासाठी चांगले वातावरण राहील. शुभरंगं: नारंगी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०७, ०९.