(12 / 13)कुंभ: आज चंद्र गोचर शुभ स्थानातून होत आहे. एक प्रकारची प्रेरणा आतून निर्माण होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. कल्पनाशक्ती आणि दूरदर्शी पणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमज, वितंडवादाची गाठोडी मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. शुभरंग: जांभळा शुभदिशा: पश्चिम.शुभअंकः ०६, ०८.