(2 / 13)मेषः आज गुरू-हर्षलशी होणारा योग पाहता काही लाभदायक आर्थिक योजनांचा पाठपुरावा कराल. जुनी येणी वसूल होतील. त्यासाठी मित्रमंडळींचे सहकार्य उत्तम मिळेल. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढला तरी त्यातील शॉर्टकट शोधून काम सोपे कराल. घरातील लांबलेल्या कामांकडे लक्ष द्याल. घरातील प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी वातावरण लाभेल. आपल्या स्वभावातील दूरदर्शीपणामुळे कठीण परिस्थिती यशस्वीरित्या हाताळाल. उद्योग व्यवसायात नविन विचार नवीन विषय पुढे येतील. आर्थिक दृष्या खुपच उत्तम दिवस आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील.नवे मित्रमैत्रिणी भेटतील. नवीन वास्तु बाबतचा विचार आग्रहाने पुढे येईल व निर्णय घेतला जाईल. संतती करिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज दीर्घकालीन गुंतवणूक नक्की करावी भविष्यात ही गुंतवणुक आपणास फायदेशीर ठरेल.शुभरंग: केशरी शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०७, ०९.