Rashi Bhavishya Today: आज शुक्र-चंद्र राजयोगात 'या' राशींना रोजगारात मिळणार मोठ्या संधी! वाचा राशिभविष्य
- Rashi Bhavishya Today 19 September 2023 : काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक आहे तर काही राशींसाठी आजचा दिवस काळजी घेण्याचा आहे. हितशत्रू आणि इतर व्यक्ती त्रास देतील. आरोग्य सांभाळा. सप्ताहात बुधाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना होणार फायदा, वाचा राशिभविष्य.
- Rashi Bhavishya Today 19 September 2023 : काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक आहे तर काही राशींसाठी आजचा दिवस काळजी घेण्याचा आहे. हितशत्रू आणि इतर व्यक्ती त्रास देतील. आरोग्य सांभाळा. सप्ताहात बुधाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना होणार फायदा, वाचा राशिभविष्य.
(2 / 13)
मेष: आज बौद्धिक क्षेत्रात प्रगती करू पाहणाऱ्या व्यक्तीनी आज मात्र जपुन पाऊल टाकावी लागणार आहेत. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. नावलौकिक प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार मिळणार नाही. व्यापारात व्यवहार सावधानीपूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळेल अशी परिस्थिती राहिल. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. कर्ज घेणे देणे टाळा. कायदेशीर बाबीत कठीण पेचप्रसंगात गुंतले जाल. आर्थिक हानी संभवते.शुभरंगः नारंगी शुभदिशाः दक्षिण.
(3 / 13)
मेष: आज बौद्धिक क्षेत्रात प्रगती करू पाहणाऱ्या व्यक्तीनी आज मात्र जपुन पाऊल टाकावी लागणार आहेत. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. नावलौकिक प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार मिळणार नाही. व्यापारात व्यवहार सावधानीपूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळेल अशी परिस्थिती राहिल. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. कर्ज घेणे देणे टाळा. कायदेशीर बाबीत कठीण पेचप्रसंगात गुंतले जाल. आर्थिक हानी संभवते.शुभरंगः नारंगी शुभदिशाः दक्षिण.
(4 / 13)
मिथुन: आज आपल्या नवीन योजना यशस्वी होतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. मनप्रमाणे फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्याचे कौतुक हाईल. स्वभावातील रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल.आपल्या कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार वाढणार आहे.शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर.
(5 / 13)
कर्क: आज आपणास दिवस आनंदी जाईल. जमीन वाहन व्यवसायातील व्यक्तींना दिनमान फायदेशीर ठरेल. लाभदायक दिवस आहे. दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. साहित्य संपादन या क्षेत्रातील व्यक्तींना मानधनात वाढ होऊन आर्थिक लाभ होतील. व्यापारात जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. सत्ताधारी प्रशासन यांच्याकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याबद्दल मानसन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल.शुभरंगः सफेद शुभदिशाः वायव्य.
(6 / 13)
सिंहः आज आनंददायक वातावरण राहिल. कुटूंबातील सदस्याचे आपल्या विषयी चांगले मत असेल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. प्रयत्नाच्या तुलनेत यश आधिक मिळेल. व्यापारीवर्गास मोठी आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिनमान आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. नवीन योजना प्रकल्प यांचा विस्तार वाढ होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. आकस्मिक धनलाभ होईल.शुभरंगः लाल शुभदिशाः पुर्व.
(7 / 13)
कन्या: आज शुभकामाची रूपरेषा आखाल. राजकीय कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीत कामा प्रती सजग रहा. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. प्रवासा तुन लाभ होईल. परदेशभ्रमणाची शक्यता आहे. स्पर्धा परिक्षेत प्राविण्य मिळेल. कौटुंबिक सौख्य वाढेल. आरोग्यही उत्तम राहील.शुभरंगः पोपटी शुभदिशाः उत्तर.
(8 / 13)
तुला: आज मनाची उद्विग्नता वाढेल. आपण केलेल्या कार्याचा परतावा मिळणे कठीण जाईल. नोकरीत वरिष्ठांच्या विचारा विरुद्ध जाऊ नका. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. नुकसानकारक योग आहेत. राग आणि उत्तेजित पणा वाढेल. मुलांकडून काही बाबतीत त्रास होईल. त्यांच्याशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. मन चिंताग्रस्त राहील. मनावर संयम ठेवा. शस्त्रक्रिया अपघात भय संभवते. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करु नका. मानसिकदृष्या त्रास जाणवेल.शुभरंगः पिवळसर शुभदिशाः आग्नेय.
(9 / 13)
वृश्चिक: आज मानअपमानाचे प्रसंग घडतील. नोकरीत अनुकुलता राहिल. शासकीय कामकाजा करिता सफलतादायक दिवस आहे. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. प्रेमप्रकरणात कुटुंबातील विरोधाला सामोरे जावे लागेल. कायदा क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. महत्वाची कागदोपत्रे मात्र संभाला. गहाळ होण्याची शक्यता आहे. सुख चैनीच्या वस्तूत खर्च वाढेल. व्यापारी वर्गास मोठे व्यवहार फायदेशीर ठरतील.शुभरंगः केसरी शुभदिशाः दक्षिण.
(10 / 13)
धनु: आज विचारपूर्वक कामे करा. साथीदाराच्या कामावर लक्ष असु द्या. वारसा हक्क पेन्शन विमा या कामात यश येईल. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात वातावरण असंतोषजनक राहील. गुप्तशत्रुकडून कारवाया घडतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. शारिरिक थकवा जाणवेल. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. शक्यतो प्रवास टाळा. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होइल. मानसिक शांती राखण्याचा प्रयत्न करा.शुभरंगः पिवळा शुभदिशाः ईशान्य.
(11 / 13)
मकर: आज रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार कारखानदार वर्गाची व्यवसायात वाढ होईल. कला तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यशाची संधी मिळेल. कलाक्षेत्रातील महिला अनुकूल प्रगतीच शिखर गाठतील. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. अनुकुल फळ प्राप्त होईल.शुभरंगः निळा शुभदिशाः नैऋत्य.
(12 / 13)
कुंभ: आज नोकरी रोजगारातील बदल प्रतिकुल ठरतील. धार्मिक शिक्षण क्षेत्रात कर्तुत्वाची संधी मिळेल. आरोग्य प्रकृति स्थिर व उत्साहपूर्ण राहणार आहे. बौद्धिक व शैक्षणिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबासोबत तीर्थस्थळावर प्रवास घडेल. आज व्यापार वाढीच्या दृष्टीकोनातून उत्तम दिवस आहे. व्यवहार कुशलते मुळे आर्थिक लाभ होतील. वरिष्ठ व्यक्तींच्या स्तुतीस पात्र ठराल. परमेशरावर विश्वास दृढ होईल. प्रकृति स्थिर व उत्साह पूर्ण राहणार आहे. नवनवीन क्षेत्रात संधी निर्माण होईल. शुभरंगः जांभळा शुभदिशाः पश्चिम.
(13 / 13)
मीन: आज अचानक धनलाभ होईल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारीवर्गासाठी बर्याच संधी प्राप्त होतील. सकारात्मक परिणाम जाणवतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. भातृसौख्य उत्तम लाभेल. भावाकडून नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. परमेश्वरा विषयी श्रद्धा वाढेल. तिर्थक्षेत्री प्रवास होतील. आर्थिक बाबतीत कोणावर विसंबून राहू नका. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहिल. शुभरंगः पिवळसर शुभदिशाः ईशान्य.
इतर गॅलरीज