(2 / 13)मेषः आज चंद्र-हर्षल युतीयोगात आपण केलेल्या कामाची सुरुवात चांगली होईल. कष्टाने का होईना जूनी येणी वसूल होतील. त्यामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आनंद वाटेल. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक प्रगतीच्या नवीन व संधी प्राप्त होतील. व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या व मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. प्रशंसा व मानसन्मान मिळेल. भावडांशी चांगले संबंध राहतील. मानसिक व शारीरिक स्वास्थ लाभणार आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. अल्पकालीन गुंतवणुकीत नुकसान होऊ शकते.शुभरंग: केशरी शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०४, ०९.