(2 / 13)मेष: आज शुल आणि धृती योगात हातुन चांगली कामे होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. निरनिराळ्या कल्पना आमलात आणा. विद्ववत्तेत वाढ होईल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. रोजगारात यश व लाभ मिळण्याची पुरेपुर शक्यता आहे. व्यापार व्यवसायात विस्तारासंबंधी योजना आखाल. मनाजोग्या घटना घडतील. प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे आपल्या गोष्टी लोकापर्यंत पोहचवण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ झाल्याने आनंदी रहाल. संततीविषयी चिंता मिटेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. धैर्य आणी संयम राखा. शुभप्रद घटना घडतील. अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. शुभरंगः तांबूस शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०५, ०९.