Rashi Bhavishya 16 January 2024: आज १६ जानेवारी मंगळवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी आजचा करिदिनचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या आजचा शुभ अंक, शुभ रंग व शुभ दिशा.
(1 / 13)
आज १६ जानेवारी मंगळवार रोजी, करिदीन आणि भद्राकाळ आहे. चंद्र शनिच्या नक्षत्रातुन गोचर करणार असून केतुशी प्रतियोग करणार आहेत. परिघ योग आणि कौलव आणि तैतील करणात आजच्या वर्जदिनी कसं असेल आपल्या राशींना ग्रहाचं बलं! वाचा राशीभविष्य!
(2 / 13)
मेष: आज केतुशी होणारा चंद्रयोग पाहता किरकोळ मुद्यांवर तात्त्विक वाद उकरून काढाल. इतरांना होणाऱ्या त्रासाची अजिबात पर्वा करणार नाही परंतु यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जातील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. काही क्षुल्लक गोष्टींबाबत मानसिक त्रास होण्याची शक्यता. व्यवसायात जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीत बदल करण्याच्या संधी वा मुलाखती लांबणीवर पडतील. कौटुंबिक पातळीवर कुटुंबातील सदस्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात आर्थिक नियोजानावर सावधानीपूर्वक निर्णय घ्या. मुलाची चिंता सतावेल. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढणार आहे. दुरवरचे प्रवास टाळावेत. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. नियोजीत कार्य पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल.शुभरंग: नारंगी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०४, ०८.
(3 / 13)
वृषभ: आज चंद्र-केतु संयोग पाहता उद्योगक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. नवीन योजना राबवाल. कलेच्या क्षेत्रात खूप काम कराल परंतु त्यासाठी लगेच संधी मिळणार नाही. तुमची बौद्धीक आणि मानसिक उन्नती होईल. नावलौकिक मिळेल. रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. व्यापारात काहीबाबतीत अडचणी निर्माण होतील. आज व्यवहारात सावधपणा बाळगा. आर्थिक बळ कमी पडल्याने योजना अपूर्ण राहाण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. मनावर नियंत्रण ठेवा. शांत आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.शुभरंगः पांढरा शुभदिशाः वायव्य.शुभअंकः ०४, ०७.
(4 / 13)
मिथुन: आज शनिच्या नक्षत्रातील चंद्रभ्रमणात शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ नक्की मिळेल. हाताखालच्या लोकांचे सहकार्य चांगले मिळेल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील. रोजगारात अत्यंत महत्वपूर्ण कामात सावधानतेने पाऊल उचला. कामात उत्साह वाढणार आहे. जबाबदारीत वाढ होईल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमत्ता संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणीं कडून सहकार्य लाभणार आहे. एकंदरित कामकाजा साठी दिवस चांगला राहणार आहे.शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.शुभअंकः ०३, ०६.
(5 / 13)
कर्क: आज चंद्रबल अनिष्ट असल्याने मनात नसताना प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. पायाची दुखणी होऊ शकतात. संततीच्या वागण्या बोलण्याचा त्रास होऊ शकतो. संसारात जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागले तरी त्यात थोडी तडजोडही करावी लागेल. प्रवास आवश्यक असल तरच करा. नोकरीत कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल. नोकरीत स्वतःचा निर्णयावर ठाम राहिल्याने आपल्याला प्रतिकूल परिणाम दिसून येतील. आपले प्रयत्न यशस्वी होण्यास अडथळे निर्माण होतील. सन्मान व किर्ती डागळण्याची शक्यता आहे. खर्च विचारपूर्वक करावा. सरकारी कामे रखडतील. व्यापारात आर्थिक हानी घडण्याची शक्यता आहे. मनस्ताप हानी होण्याची शक्यता चालूनही आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. शुभरंगः गुलाबी शुभदिशाः वायव्य.शुभअंकः ०२, ०७.
(6 / 13)
सिंहः आज परिघ योगात रोजगारात घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष रहातील. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायात अचानक फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिकतेकडे जास्त कल राहील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगल्यापैकी मूड लागेल. प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. आत्म विश्वासात वाढ झाल्याने कोणतेही काम सहजतेने करु शकाल. कुंटुंबातील समस्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर नियोजन सोडविण्याचा प्रयत्न करा. व्यापारिक वाद संपुष्टात येतील. सरकारी काम वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. मौजमजा करण्याकडे कल राहिल. वाद विवाद टाळावेत. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. परदेश भ्रमण घडेल. प्रवासातुन आर्थिक लाभ होईल.शुभरंग: लालसर शुभदिशाः पूर्व.शुभअंकः ०५, ०८.
(7 / 13)
कन्या: आज चंद्रबल अनिष्ट असल्याने तुम्ही श्रद्धाळू असलात तरी तुमच्या विचारांमध्ये कायम एक गोंधळ राहील. तरुणांना प्रेमात पडावेसे वाटेल पण ते व्यक्त करण्याचे धाडस गोळा करावे लागेल. थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल. अवास्तव गोष्टींकडे जास्त आकर्षित व्हाल. खूप सद्भावनेने एखादी गोष्ट करायला जावी आणि पदरी फक्त वाईटपणा यावा असा अनुभव येण्याची शक्यता आहे. व्यापारात नोकरीत रागावर नियंत्रण ठेवा. संयम बाळगुन काम करा. अन्यथा हानी संभवते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद निर्माण होतील. नवीन खरेदीत पैसे खर्च होतील. व्यापारात प्रसिद्धी आणि यश मिळयाची शक्यता आहे. सामाजिक किंवा साहित्यिक समारंभात भाग घ्याल. भांडण आणी वाढविवाद टाळावेत. पत्नीसोबत वाद घालू नका. शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.शुभअंकः ०३, ०६.
(8 / 13)
तूळ: आज चंद्र अनुकूल असल्याने स्थिती राहणार आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली जाईल. त्याचा फायदा कामासाठी होईल. पैसे मिळाले तरी ठरवलेल्या कारणासाठीच पैसा खर्च कराल. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. कामाच्या ठिकाणी योग्य तेथे कर्तव्य निभावाल. तुमच्या स्वभावातील वेगळे कंगोरे प्रकर्षाने दिसून येतील. कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग करून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. कामकाजामध्ये वाढ होईल. विचारा अंतीच काळजी पूर्वक निर्णय घ्या. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. ज्यांच्या भविष्यात फायदा होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीकारक दिनमान आहे. मुलांकडून समाधान लाभेल. आज आर्थिक लाभ होतील. शुभरंगः भगवा शुभदिशाः आग्नेय.शुभअंकः ०२, ०७.
(9 / 13)
वृश्चिकः आज चंद्र-केतु प्रतियोग असल्यामुळे सरकारी कामकाजामुळे अडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी व्यवसायात धाडस दाखवाल त्यामुळे कामाची गती वाढून फायदा होईल. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी चालून येतील. व्यापारात नवीन कार्याची योजना आखाल. नोकरीतील नवीन योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. व्यापार चांगला चालेल. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याचे योग मिळेल. शुभरंग: नांरगी शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०१, ०९.
(10 / 13)
धनुः आज आज कौलव आणि तैतील करणाचा प्रभाव असल्याने वडिलोपार्जित धंद्यामध्ये वाढ कराल. किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. नवीन नोकरी लागू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. दुसऱ्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. व्यवसायात बरीच उलाढाल कराल. विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत चांगले यश मिळू शकते. घरामध्ये छोट्या समारंभाच्या निमित्ताने प्रियजनांची गाठभेट होईल. उद्योग व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लाभ होतील. आत्मविश्वास वाढीस लागल्याने कठीण पेचप्रसंगावर सहज मात कराल. रोजगारात स्वतःचे निर्णय महत्वपूर्ण राहतील. सामाजिक कार्यात सक्रीय भूमिका राहील. व्यापार रोजगार चांगला चालेल. मुलांसंबंधातील कामात प्रगती होईल. शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.शुभअंकः ०३, ०५.
(11 / 13)
मकरः आज चंद्राचं राशीस्वामी शनिच्या नक्षत्रातील भ्रमणात राजकारणात असलेल्या व्यक्तींना समाजाच्या खालच्या थरापर्यंत पोचावे लागेल. घरात सर्वांनी शिस्त पाळावी असं वाटेल परंतु त्याची सुरुवात प्रथम तुमच्या पासून करा. नोकरीमध्ये कोणावरही अवलंबून राहू नये. स्वत:ची कामे स्वतः करावीत. प्रेमप्रकरणात घरच्या विरोधाला तोंड द्यावे लागेल. रोजगारात विपरित प्रसंग घडतील. आर्थिक टंचाई निर्माण होतील. मनात नैराश्य निर्माण होईल. अविचारी निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. विचार पूर्वक निर्णय घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे करण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल. खर्चामध्ये वाढ होईल. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्या. वाहन सावकाश सांभाळुन चालवा. अपघात भय संभवते. कुटुंबातील खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य.शुभअंकः ०४, ०८.
(12 / 13)
कुंभः आज चंद्र भ्रमणात तुमच्या हजरजबाबी स्वभावा मुळे लोकांवर प्रभाव पाडाल. राजकारणी लोक आपला मुत्सद्दीपणा दाखवतील. भक्तिमार्गाकडे वळाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. नोकरी व्यवसायात तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. एखादे काम धाडसाने करण्यात तुमचा पुढाकार असेल. इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. आपले विचार योग्य ठेवा. नोकरी रोजगारात प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मित्र आणि शुभचिंतक याच्या माध्यमातून आपल्या समस्या दूर होण्यास मदत होईल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहिल. नोकरीत प्रगती होण्याचे संकेत मिळतील. मोठ्या तसेच प्रतिष्ठित लोकांशी संबंध वाढतील. कुटुंबातील सदस्याची प्रगती होईल. विचारपूर्वक कामे केली तर आजचा दिवस चांगला जाईल. शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम शुभअंकः ०१, ०७.
(13 / 13)
मीनः आज चंद्रबल उत्तम असल्याने व्यवसायात एखादे काम नवीन पद्धतीने कसे करता येईल हे सांगण्याचे धाडस कराल. आर्थिक आवक चांगली राहील. ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना त्यातून बऱ्यापैकी पैसा मिळेल. घरामध्ये सहलीला जाण्याचे बेत ठरतील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून आपल्या कामाचे कौतुक होईल. वातावरण उत्साहवर्धक राहील. शुभरंगः पिवळा शुभदिशा: ईशान्य.शुभअंकः ०३, ०९.