(2 / 13)मेषः आज राहु-नेपच्युन-शनिशी होणाऱ्या संयोगात मोठे आर्थिक व्यवहार करू नयेत. थोडे आस्थिर आणि चंचल बनाल. व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. प्रकृती स्वास्थ्य वरचेवर बिघडण्याची शक्यता आहे. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक जोडीदार भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहिल. मित्रांकडून व्ययकारक प्रस्ताव येतील. कुटुंबात मंगलकार्याची रुपरेखा नियोजन कराल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. शुभरंगः नारंगी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०२, ०९.