(2 / 13)मेषः आज चंद्र बलवान असल्याने बौद्धीक गोष्टींकडे ओढा राहील. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळेल असं वाटत असेल तर योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. तुम्ही करीत असलेल्या कामाची पावती तुम्हाला मिळेल. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी अंगावर घेऊन पार पाडण्याची कुवत आज दाखवून द्याल. आर्थिक आघाडी वर प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. स्वभावातील रागीटपणावर मात्र नियंत्रण ठेवा. निर्माण होईल. कुटुंबापासुन वेगळे राहण्याचे प्रसंग येतीलशुभरंगः नांरगी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०१, ०५.