(2 / 13)मेष: आज चंद्र शुक्राशी संयोग करीत असल्याने व्यापार व्यवसायात कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा. व्यवहारात नवनवीन गोष्टींचे जरा जास्तच आकर्षण राहील. नोकरी व्यवसायात सरकारी कामकाजामुळे काही कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील. काही सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. अतिआत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका. व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. शुभकार्यात सहभाग घ्याल. यश व उत्साह वाढणार आहे. संकुचित मनोवृत्ती टाळा. विद्यार्थीवर्गाची विद्याभ्यासात प्रगती होईल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहील. आपल्या व्यसनांवर आवर घाला. कुटंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. अचानक लाभ होतील. शुभरंग: केशरी शुभदिशा: दक्षिण.शुभअंकः ०४, ०९.