मेषः
आज फायदा होईल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. मोठ्या व्यवहारात सावधानी बाळगा. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे नोकरी व्यापारात कामाचा विस्तार होईल. रागीटपणावर मात्र नियंत्रण ठेवा.
वृषभ:
आज गोड बोलण्यावर भर ठेवाल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. आनंददायी वातावरण राहील. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे.
मिथुन:
आज कामाला जास्त महत्त्व द्याल. खूप नकारात्मक विचार मनात येतील. त्यांना सकारात्मक बनवलेत तर कामे पुढे जातील. मनावरचा ताण बर्यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे. उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा.
कर्क:
आज भाग्याची साथ चांगली मिळेल. घरात आणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.
सिंह:
आज थोडी निराशा वादी प्रवृत्ती राहील. करियरमध्ये खूप कष्ट करावे लागतील. स्थावर इस्टेटीचे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. कोर्टकचेरीच्या कामामध्ये अडचणी वाढतील. काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्या कडे लक्ष द्या. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क रहा.
कन्या:
आज विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील. मानसिक त्रास निर्माण होणाऱ्या घटना घडतील. मनात उदासिनता वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. मनाविरुद्ध कार्य घडतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात.
तूळ:
आज आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे अनेक बेत ठरवाल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. मनोधैर्य सांभाळा. विचारा अंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. कार्यक्षेत्रात आपल्या विषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. प्रकृति अस्थिर राहील. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा.
वृश्चिक:
आज नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राहील. परदेशगमनाच्या संधी मिळतील. उत्साह वाढेल. धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. नास्तिकता वाढीस लागेल. अनाठायी खर्च होईल. उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्या सारख्या घटना घडतील. खर्चाने मन व्यथित होईल. प्रवास टाळा.
धनु:
आज काहीतरी उलाढाल करत राहाल. प्रवासात काळजी घ्यावी. नशिबाची साथ चांगली मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहाल. नावलौकिक वाढेल. विद्याभ्यासात प्रगती कराल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
मकर:
आज यश मिळेल. कामांना न्याय देण्यासाठी जीवाचे रान कराल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्यांना विशेष संधी मिळतील. संततीकडून उत्तम सुख मिळेल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील.
कुंभ:
आज आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वास उत्तम राहील. घरासंबंधी समस्या होऊ शकते. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजी पूर्वक व्यवहार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.