Today Horoscope 8 September 2024 : आज ऐंद्र योग व बव करण राहील. आज भाद्रपद पंचमी तिथि आहे, चंद्र तूळ राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा सुट्टीचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेषः
आज बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रसिद्धीचे योग येतील. चांगल्या संधी निर्माण होतील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभा बरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. फायदेशीर काळ आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृषभः
आज राहणीमान उंचावण्यासाठी बराच पैसा खर्ची टाकाल. व्यवसायात गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना आखाल. वरिष्ठांची मर्जी झाल्यामुळे प्रमोशनही मिळू शकते. सार्वजनिक कार्यात पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहेत. मेहनत वाढवावी लागणार आहे.
मिथुनः
आज वेळेचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. घरातील वातावरण सुधारेल. विद्यार्थ्यांनी कोणताही अविचार करू नये. नोकरीत अधिकार मिळेल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे यशस्वी होतील. नवीन धोरणं योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.
कर्कः
आज खर्च करावा लागेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.
सिंहः
आज मनाचा गोंधळ उडेल. काही घरगुती गोष्टींमुळे अस्वस्थता वाढेल. थोडा ताण राहील. अपेक्षित कार्य पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल.
कन्याः
आज हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. लाबंच्या प्रवासाचे योग येतील. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मोठ्या अधिकाराची नोकरी मिळेल.
तूळ:
आज स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. संततीच्या बाबतीत दोन पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल. इथे सुवर्णमध्य काढावा लागेल. आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्यही जपा. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. मानसिक त्रास होईल.
वृश्चिकः
आज प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित यश संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे गरजेचे राहील.
धनुः
आज धनलाभ प्राप्तीचे योग आहेत. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. कामाचा दर्जा सुधारून टाकाल. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. विवाह इच्छूकांना आपला जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. स्वभाव मन मिळावु राहील. आर्थिकदृष्या लाभ होईल.
मकरः
आज घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. प्रत्येक गोष्टीचा उगाचच विचार करीत राहाल. कर्ज फेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर राहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहील.
कुंभः
आज उत्तम आर्थिक फायदा होईल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. विरोधावर मात करण्याची ताकद येईल. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील. अध्यात्मिक उन्नती साधाल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील.
मीनः
आज ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. अस्वस्थ व्हाल. जास्तच कष्ट घ्यावे लागतील. मोठ्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल. घरातील वातावरण ताणतणावात्मक राहील. उद्योग धंद्यात लक्ष कमी राहील. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. वेळेचा अपव्यय टाळा. मनस्ताप होणाऱ्या घटना टाळणं गरजेचं आहे.