(2 / 13)मेष: आज काहीसे अडचणीत आणणारे दिनमान राहील. खाण्या-पिण्याची पथ्य पाळा. जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. प्रवास करू नका. आर्थिकबाबतीत थोडी अस्थिरता जाणवेल. विपरित परिणाम दिसतील. बँकेत कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. जोडीदारासोबत वैचारिक पातळीवर मतभेद होण्याची शक्यता आहे.