(3 / 13)वृषभ: आज तुमच्या कामाचा वेग आणि धाडस वाखाणण्यासारखे असेल. धंद्यात चांगली प्रगती कराल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. आपल्या इष्ट देवतेची उपासना आणि चिंतन मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडेल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. उत्तम दिनमान आहे.