Astrology prediction today 4 October 2024 : आज ४ ऑक्टोबर २०२४ रोजी, आश्विन द्वितीया तिथी असून, चंद्र तूळ राशीतुन भ्रमण करत आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
(1 / 13)
Today Horoscope 4 October 2024 : आज वैधृती योग आणि बालव करण राहील. आज आश्विन द्वितीया तिथी असून, नवरात्रचा दुसरा दिवस आहे, चंद्र तूळ राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा शुक्रवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
(2 / 13)
मेषः आज आर्थिक कामे मार्गी लागतील. वातावरणामुळे सुखावून जाल. करिअरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल. कौतुकास पात्र व्हाल. कौटुंबिक सहकार्याने चांगला दिवस जाणार आहे. प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपुन घ्यावा. देश-विदेशात फिरण्यासाठी उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रिणींबरोबर सलोख्याचे संबंध होतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहील. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कर्ज प्रकरण मंजुर होतील.
(3 / 13)
वृषभः आज जुने मित्र भेटतील. स्वप्नांच्या दुनियेतच वावराल. स्वतःसाठी चोखंदळपणे खरेदी कराल. काही महत्त्वाचे निर्णय अविचारपणे घेतले जाण्याची शक्यता आहे. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. जोडीदाराचे सहकार्य लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढीस लागेल. नोकरी व्यवसायात समाधान कारक प्रगती राहील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. प्रगती उत्तम राहील.
(4 / 13)
मिथुनः आज घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. घरामध्ये मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही आनंदी वातावरण निर्माण होईल. वारसा हक्कातुन मिळणारी संपत्तीविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. मनात उर्जा आणि उत्साह वाढेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे.
(5 / 13)
कर्कः आज पूर्वी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक गोष्टींचे लाभ मिळणार आहेत. तुमच्या व्यक्तीमत्त्वात सुधारणा कराल. फायदा होईल. एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील.
(6 / 13)
सिंहः आज नोकरी व्यवसायात अडलेली कामे पार पडतील. योग्य वेळी समयसूचकता दाखवाल. तुमचे विचार स्वच्छ आणि स्पष्ट राहतील. व्यवहारात फायद्याच्या गोष्टी ओळखाल. करिअरमध्ये महत्त्वाच्या संधी येतील. कामाचे उत्तम नियोजन खूप उपयोगी पडेल. दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे ऐकावे लागेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मुलाखती मध्ये यश मिळेल.
(7 / 13)
कन्याः आज आर्थिक स्त्रोत निर्माण होईल पण हातात पैसा राहाणार नाही. पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. कामकाजात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल.
(8 / 13)
तूळ: आज करिअरमध्ये परदेशी कंपन्यांशी संबंध येईल. अडलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालाल. खूप काम करावेसे वाटले तरी प्रकृती थोडी नरमगरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल. महत्वाच्या कामाबाबतीत जपून निर्णय घ्या. आपल्या मनात नकारात्मक भावना वाढीस लागेल. ताणतणाव पूर्ण सुरुवात होईल. आळसीवृत्ती टाळावी.
(9 / 13)
वृश्चिकः आज प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल. कलाकरांना अनेक संधी दार ठोठावतील. खूप दिवसांपासून मनात असलेली एखादी गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. पैशाबाबत काटेकोर राहाल. परदेशगमनाचे योग संभवतात. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे.
(10 / 13)
धनुः आज वाहने जपून चालवा. जुनी दुखणी डोके वर काढतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पैसे मिळाले तरी खर्चही तसेच वाढणार आहेत. मनाप्रमाणे कामे घडतलीच असे नाही. अनेपक्षित नुकसान देखील होऊ शकते. महत्वाची कामे शक्यतो टाळा. काही नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. मनावर संयम ठेवून वाटचाल करावी. कामाचा ताणतणाव राहील. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान संभवते.
(11 / 13)
मकरः आज अत्यंत शुभ दिवस असणार आहे. सूचक स्वप्ने पडतील. स्वस्थ बसणार नाही. कामामुळे आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. नविन योजनेतून लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. कामात यश मिळेल.
(12 / 13)
कुंभः आज आर्थिक योजनांचा पाठपुरावा कराल. जुनी येणी वसूल होतील. शॉर्टकट शोधून काम सोपे कराल. घरातील लांबलेल्या कामांकडे लक्ष द्याल. घरातील प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी वातावरण लाभेल. आर्थिक दृष्या खुपच उत्तम दिवस आहे. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. संतती करिता दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील.
(13 / 13)
मीनः आज मनाला ताण जाणवेल. स्पर्धा परीक्षांसाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतील. व्यसनांपासून सावध राहा. प्रवासामध्ये आपल्या चीजवस्तूंची काळजी घ्या. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवा. आळस झटकुन कामाला लागा. शारिरिक आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या.