Astrology prediction today 4 August 2024 : आज ४ ऑगस्ट २०२४ रविवार रोजी, आषाढ कृष्ण अमावस्या तिथी आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
(1 / 13)
Today Horoscope 4 August 2024 : सिद्धी योग व किस्तुघ्न करण राहील. चंद्र प्लुटोशी प्रतियोग तर राहु नेपच्युन बरोबर नवमपंचम योग करीत असून, योग-संयोगात कसा जाईल आजचा रविवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
(2 / 13)
मेषः आज आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. जगा वेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल.
(3 / 13)
वृषभः आज आर्थिक प्रगती करण्याबरोबर आपले आरोग्यही जपा. अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
(4 / 13)
मिथुनः आज वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील. कुटुंबात तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील.
(5 / 13)
कर्कः आज तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील ज्ञानाचा तुम्हाला खूप उपयोग होईल. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. खरेदीचे योग येतील. घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
(6 / 13)
सिंहः आज व्यवहार सांभाळून करा. अपेक्षित कार्य पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. पटकन एखादा निर्णय घेण्याचा अविचारही हातून घडू शकतो. तज्ञ व्यक्तींचे सल्ले मात्र उपयोगी पडतील. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. व्यापार करणाऱ्यांना कामाचा व्याप वाढणार आहे.
(7 / 13)
कन्याः आज कर्जप्रकरणात दिलासा मिळेल. वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. आर्थिक लाभा बरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. जुनी येणी अचानक वसूल होतील.
(8 / 13)
तूळ: आज आर्थिक स्थिती समाधान कारक झाल्यामुळे निवांत राहाल. मोठे प्रवासाचे योग येतील. कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. नवनविन संधी मिळणार आहे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. कागदोपत्री तपासणी काळजी पूर्वक करणे आवश्यक आहे.
(9 / 13)
वृश्चिकः आज फायदेशीर व्यवहार करता येतील. उत्साह वाढेल. प्रवासाचे योग येतील. तुमच्या कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील.
(10 / 13)
धनुः आज जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील. मनात नसताना प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. हजरजबाबी स्वभावामुळे लोकांवर प्रभाव पाडाल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. आकस्मिक धनलाभ प्राप्तीचे योग आहेत. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत.
(11 / 13)
मकरः आज व्यवसायिकांना अनुकूल काळ आहे. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर राहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील.
(12 / 13)
कुंभः आज बोलण्यावर संयम ठेवा. कर्जप्रकरण काळजीपूर्वक हाताळा. काळजी घ्यावी लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणावात्मक राहील. व्यवसायिकांचे उद्योगधंदयात लक्ष कमी होईल. आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे.
(13 / 13)
मीनः आज तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. घरात एखादी चांगली खरेदी कराल. कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे नावलौकिकता वाढेल. वारसाहक्काने धन व संपत्ती लाभणार आहे. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल.