Astrology prediction today 31 August 2024 : आज ३१ ऑगस्ट २०२४ रोजी, शेवटचा श्रावण शनिवार आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
(1 / 13)
Today Horoscope 31 August 2024 : आज वरियान योग व गरज करण असून, आज श्रावण त्रयोदशी आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा महिन्याचा शेवटचा शनिवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
(2 / 13)
मेष: आज नशीबाचे पाठबळ लाभणार आहे. नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. विरोधकही शांत होतील. यश मिळेल. बढती व बदलीसाठी उत्तम दिवस आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दुरचे प्रवास घडतील. परदेशगमनाचे योग आहेत. प्रेमप्रकरणात यश येईल. आहारावर नियंत्रण ठेवा. मानधनात वाढ होईल.
(3 / 13)
वृषभ: आज मौल्यवान वेळ वाया घालवू नये. व्यायामाचा समावेश अवश्य करावा. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. राग आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा. वादविवादातून मनस्ताप होईल. खर्चात वाढ होईल.
(4 / 13)
मिथुन: आज स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. परदेशात नोकरी करण्यास किंवा अभ्यास करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी किंवा कार्यरत व्यावसायिकांसाठी अनेक संधी निर्माण होऊ शकतात. प्रॉपर्टीच्या कामात यश मिळू शकते. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. यश निश्चित लाभेल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल.
(5 / 13)
कर्कः आज यश मिळवावे. विरोधकांवर मात कराल. नेतृत्वगुण विकसित होईल. नवीन प्रकल्पांमध्ये सहज व्यवहार करू शकाल. कौटुंबिक जीवन खूप चांगले ठेवाल. नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. बढती व वेतनवाढीचा योग आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. पती पत्नीतील संबंध दृढ होतील.
(6 / 13)
सिंहः आज कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी विवाद टाळा. मनात नैराश्य निर्माण होईल. विचार पूर्वक निर्णय घ्या. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल. नवीन संधीचा योग आहे. नोकरीत स्थान बदल होईल. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवास निरर्थक ठरतील. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. दुर्व्यसनांपासून सावध राहा.
(7 / 13)
कन्या: आज कुंटुंबात सलोख्याचं वातावरण निर्माण होईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षेप्रमाणे यश येईल. नवीन कार किंवा घर घेण्याचे धैर्य वाढवू शकाल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. मन प्रसन्न राहील. मान सन्मानात वाढ होईल.
(8 / 13)
तूळ: आज आत्मविश्वास वाढेल. उत्पन्नाचे अधिक स्रोत विकसित करण्याच्या स्थितीत असाल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादही मिटतील. नवीन कार किंवा घर खरेदी करण्याची परिस्थिती होईल. यशाचा दिवस आहे. कर्मावर विश्वास ठेवा. कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. तुम्हाला भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. मानसन्मान मिळेल. आर्थिक लाभ होतील. प्रगतीकारक दिवस आहे.
(9 / 13)
वृश्चिक: आज भरपूर आर्थिक लाभ होईल. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सन्मान आणि लाभ मिळेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. मन समाधानी राहील. धनलाभाचा दिवस आहे. मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. आकस्मिक लाभाचा योग आहे. मान सन्मान मिळेल. दुसऱ्याच्या कामात मात्र हस्तक्षेप करू नका.
(10 / 13)
धनुः आज वैवाहिक जीवनाबद्दल थोडे सावध राहावे लागेल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत वाढवण्यासाठी कठोर परिश्रम कराल आणि त्याचे फायदे देखील मिळतील. ताणतणावात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता राहील. आर्थिक फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा राहील.
(11 / 13)
मकर: आज व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. आप्तेष्टांच्या गाठी भेटी होतील. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. मोठा आर्थिक लाभ होईल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहील.
(12 / 13)
कुंभ: आज कौटुंबिक तणाव निर्माण होईल. संयमाने काम करा. कुटुंबातील सदस्यांसोबत सलोख्याने राहा. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मनावर संयम ठेवून राहा. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे. क्लेश उत्पन्न करणार दिवस आहे.
(13 / 13)
मीन: आज अपूर्ण राहिलेली कामे वेळेत पूर्ण कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. पदोन्नती होईल. नविन मित्र भेटतील. रोजगारात कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. मुलांच्या प्रगतीने मन समाधानी राहील. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल. कुटुंबांवर वाहन घर खरेदीस अनुकूल दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील.