Astrology prediction today 30 September 2024 : आज ३० सप्टेंबर २०२४ रोजी, भाद्रपदातील सोमप्रदोष आणि शिवरात्री आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी सोमवारचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
(1 / 13)
Today Horoscope 30 September 2024 : आज शुभ योग व विष्टी करण राहील. आज भाद्रपदातील त्रयोदशी श्राद्ध आहे, चंद्र सिंह राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा सोमवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
(2 / 13)
मेषः आज अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. समस्या दूर होतील. अडलेली कामे मार्गी लागतील. ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रसिद्धीचे योग येतील. प्रत्यय येईल. महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. नशीबाची साथ लाभणार आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील.
(3 / 13)
वृषभ: आज कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. ताणतणाव जाणवेल. यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहील. मान सन्मान मिळेल.
(4 / 13)
मिथुन: आज कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनेक जणांचे सल्लागार बनाल. मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. भरभराटीचा दिवस आहे.
(5 / 13)
कर्क: आज वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. विरोधक आक्रमक होतील त्यांचा वेळीच बिमोड कराल तर यशस्वी व्हाल. कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. उत्तम दिवस आहे. कार्यक्षेत्रात भरभराट होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. फसवणूक होण्याची शक्यता राहील.
(6 / 13)
सिंह: आज मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल. जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. काळजी घ्यावी लागेल. घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल. घरात पाहिजे तेवढे लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांचीच चिडचिड होईल. मानसिक क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे.
(7 / 13)
कन्या: आज आरोग्य उत्तम राहील. प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. यशाचं माप लगेच पदरात पडेल. प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक कायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल.
(8 / 13)
तूळ: आज कष्टाचे चीज होईल. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. वरिष्ठ खूष होतील. तब्येत खूष होऊन जाईल. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. सामाजिक मान सन्मान वाढेल. पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे.
(9 / 13)
वृश्चिक: आज एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. यशस्वी व्हाल. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. तुलनेन अधिक लाभ होतील. उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
(10 / 13)
धनुः आज आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. कलाकारांची कला बहरेल. लेखक कलावंतांना संधी मिळतील. भक्ती आणि श्रद्धेची आर्द्रता जाणवेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहील. लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या.
(11 / 13)
मकरः आज यशस्वी व्हाल. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. पैशाची कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल.
(12 / 13)
कुंभ: आज आर्थिक स्थिती सुधारण्या साठी थोडा काळ थांबावे लागेल. रात्रीचे जागरण टाळा. घाईने घेऊ नयेत. नोकरीनिमित्त घराबाहेर राहण्याचे योग येतील. दुसऱ्यांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या.
(13 / 13)
मीन: आज तरतूद करता येईल. परिस्थितीचा कल राहील. मनावरचा ताण वाढेल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. आणि याची नोंद नक्कीच सगळीकडे घेतली जाईल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. दुर्लक्ष करू नये. प्रवास नुकसानकारक राहील. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे.