Today Horoscope 3 August 2024 : वज्र योग व चतुष्पाद करण राहील. आजचा शनिवार कसा असेल, योग-संयोगात कसा जाईल आजचा शुक्रवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेषः
आज मनाला ताण जाणवेल. संतती कडून अपेक्षाभंग होऊ शकतो. व्यसनांपासून सावध राहा नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. प्रवासामध्ये आपल्या चीजवस्तूंची काळजी घ्या. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायात भागीदारासोबत वाद होण्याची शक्यताआहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
वृषभः
आज जुने मित्र भेटतील. आर्थिक पातळी वरील प्रश्न चुटकीसरशी सोडवाल. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. साथीदाराचे सहकार्य लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढेल. अनुकुल घटना घडतील. कामात वेग येणार आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासाची प्रगती उत्तम राहील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे.
मिथुनः
आज घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल. घरामध्ये मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही आनंदी वातावरण निर्माण होईल. कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. मनात उर्जा आणि उत्साह वाढेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेम भावना वाढेल.
कर्कः
आज आर्थिक स्त्रोत वाढेल. लाभ मिळणार आहेत. तुमच्या व्यक्तीमत्त्वात सुधारणा कराल. मेहनतीचे फळ मिळण्याचा योग आहे. फक्त भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील.
सिंहः
आज अडलेली कामे पार पडतील. फायद्याच्या गोष्टी ओळखाल. करिअरमध्ये महत्त्वाच्या संधी येतील. कामाचे उत्तम नियोजन खूप उपयोगी पडेल. दुसऱ्यावर विसंबून राहू नये. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे ऐकावे लागेल. आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. ऊर्जादायी आणी प्रचंड उत्साहपूर्ण दिवस असेल. स्पर्धा परिक्षा मुलाखती मध्ये यश मिळेल.
कन्याः
आज खर्च वाढल्यामुळे हातात पैसा मात्र रहाणार नाही. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. कामकाजात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. मौल्यवान वस्तुची खरेदी कराल.
तूळ:
आज करिअरमध्ये परदेशी कंपन्यांशी संबंध येईल. अडलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालाल. यंत्रावर काम करणारांनी अवश्य काळजी घ्यावी. खूप काम करावेसे वाटले तरी प्रकृती थोडी नरमगरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल. आळसीवृत्ती टाळावी. नातेवाईकांशी व्यवहार जपुन करावेत.
वृश्चिकः
आज प्रेरणा देणारे लोक भेटतील. परदेशगमनाचे योग संभवतात. नोकरीत मोजकेच काम करा पण ते बिनचूक असल्याची खात्री करा. पैशाबाबत काटेकोर राहाल. परदेश भ्रमणाचे योग आहेत. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलाचा विचार करीत असाल तर उत्तम योग आहे. मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे.
धनुः
आज वाहने जपून चालवा. जनतेचा रोष पत्करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मनाप्रमाणे कामे घडतलीच असे नाही. अनेपक्षित नुकसान देखील होऊ शकते. महत्वाची कामे करण्यास प्रतिकुल दिवस असल्याने शक्यतो टाळा. कामाचा ताणतणाव राहील. फसवणूकीसारखे प्रकार घडतील. काही नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. मनावर संयम ठेवून वाटचाल करावी.
मकरः
आज व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल. नोकरी व्यवसायात आपण करीत असलेल्या कामाची चांगल्या पद्धतीने तपासणी करा. सूचक स्वप्ने पडतील. कामामुळे आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. नविन योजनेतून लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल.
कुंभः
आज वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. आर्थिक योजनांचा पाठपुरावा कराल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढला तरी त्यातील शॉर्टकट शोधून काम सोपे कराल. कठीण परिस्थिती यशस्वीरित्या हाताळाल. उद्योग व्यवसायात नविन विचार नवीन विषय पुढे येतील. आर्थिक दृष्या खुपच उत्तम दिवस आहे. सुखत वातावरणात वृद्धी होईल.
मीनः
आज घरातील आंनदायक वातावरणामुळे सुखावून जाल. करिअरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल. स्वतंत्रपणे कार्य करण्यात धन्यता मानाल. इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल. कौटुंबिक सहकार्याने चांगला दिवस जाणार आहे. परदेश भ्रमणासाठी उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रिणींबरोबर सलोख्याचे संबंध होतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहील. व्यापारात आर्थिक लाभ होणार आहे. जुनी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल.