मेषः
आज ताण जाणवेल. भरपूर कष्ट राखून घ्यावे लागतील. व्यसनांपासून सावध राहा, नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. प्रवासामध्ये आपल्या चीजवस्तूंची काळजी घ्या. मनशांती बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. स्वभावावर नियंत्रण ठेवा. आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
वृषभः
आज विद्यार्थ्यांची अभ्यासाची प्रगती उत्तम राहील. पूर्वी केलेल्या कामाची मात्र पावती मिळेल. मानमरातब मिळेल. स्वप्नांच्या दुनियेतच वावराल. काही महत्त्वाचे निर्णय अविचारपणे घेतले जाण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढीस लागेल. प्रगती कारक आहे. अनुकुल घटना घडतील. प्रगती राहील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे.
मिथुनः
आज आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. घरामध्ये मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही आनंदी वातावरण निर्माण होईल. कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. मनात उर्जा आणि उत्साह वाढेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदारा बद्दल प्रेम भावना वाढेल.
कर्कः
आज मानमरातब आपोआप घर चालत येईल. पूर्वी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक गोष्टींचे लाभ मिळणार आहेत. तुमच्या व्यक्तीमत्त्वात सुधारणा कराल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. मेहनतीचे फळ मिळण्याचा योग आहे. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आर्थिक स्त्रोत वाढेल.
सिंहः
आज अडलेली कामे पार पडतील. मने जिंकून घ्याल. फायद्याच्या गोष्टी ओळखाल. करिअरमध्ये महत्त्वाच्या संधी येतील. कामाचे उत्तम नियोजन खूप उपयोगी पडेल. दुसऱ्यावर विसंबून राहू नये. कष्टाचे चीज होईल. ऊर्जादायी आणी प्रचंड उत्साहपूर्ण दिवस असेल. महत्वाची कार्य आज नकी पूर्ण करा. मुलाखती मध्ये यश मिळेल. केलेल्या कामात यश मिळेल.
कन्याः
आज आर्थिक बाबतीत पैसा मिळण्याच्या अनेक वाटा खुल्या होतील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. कामकाजात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. धनाचा उपभोग घ्याल.
तूळ:
आज करिअरमध्ये परदेशी कंपन्यांशी संबंध येईल. अडकलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालाल. खूप काम करावेसे वाटले तरी प्रकृती थोडी नरमगरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल. आपणास काहीस त्रासदायक ठरणार आहे. महत्वाच्या कामाबाबतीत जपून निर्णय घ्या. आपल्या मनात नकारात्मक भावना वाढीस लागेल. नातेवाईकांशी व्यवहार जपुन करावेत.
वृश्चिकः
आज प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल. कलाकरांना अनेक संधी दार ठोठावतील. परदेशगमनाचे योग संभवतात. खूप दिवसांपासून मनात असलेली एखादी गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. नोकरीत मोजकेच काम करा. परदेश भ्रमणाचे योग आहेत. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे.
धनुः
आज सावधान राहा. वाहने जपून चालवा. जुनी दुखणी डोके वर काढतील. खर्चही तसेच वाढणार आहेत. मनमानी पणे काम करण्याच्या पद्धती मुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेपक्षित नुकसान देखील होऊ शकते. महत्वाची कामे करण्यास प्रतिकुल दिवस असल्याने शक्यतो टाळा. मनावर संयम ठेवून वाटचाल करावी. कामाचा ताणतणाव राहील.
मकरः
आज कामाची चांगल्या पद्धतीने तपासणी करा. सूचक स्वप्ने पडतील. मानमरातब अधिकाराचे योग संभवतात. स्वत:बरोबर दुसऱ्याचाही फायदा कराल. व्यवसायिकांना योजना पद्धतीने केलेल्या कामामुळे आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. नविन योजनेतून लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. कामात यश मिळेल.
कुंभः
आज लाभदायक आर्थिक योजनांचा पाठपुरावा कराल. जुनी येणी वसूल होतील. कामांकडे लक्ष द्याल. घरातील प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी वातावरण लाभेल. उद्योग व्यवसायात नविन विचार नवीन विषय पुढे येतील. आर्थिक दृष्या खुपच उत्तम दिवस आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल.
मीनः
आज आर्थिक लाभ चांगले होतील. कामे मार्गी लागतील. आंनदायक वातावरणामुळे सुखावून जाल. करिअरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल. कौतुकास पात्र व्हाल. कौटुंबिक सहकार्याने चांगला दिवस जाणार आहे. परदेश भ्रमणासाठी उत्तम दिवस आहे. जुनी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कर्ज प्रकरण मंजुर होतील. प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपुन घ्यावा. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहील.