(2 / 13)मेषः आज करिअरची गती काहीशी कमी होतांना दिसेल. नोकरीत नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देऊ करतील. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. संतती कडून चांगली बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील