Today Horoscope 26 August 2024 : आज व्याघात योग आणि बालव करण असून, आज श्रावण अष्टमी आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा श्रीकृष्ण जयंतीचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेषः
आज अडकलेली कामे पूर्ण होतील. प्रमोशनही मिळू शकते. राहणीमान उंचावण्यासाठी बराच पैसा खर्ची टाकाल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. सार्वजनिक कार्यात पदप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागेल. जबाबदारीने काम करा.
वृषभः
आज घरातील वातावरण सुधारेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांनी कोणताही अविचार करू नये. नोकरीत अधिकार मिळेल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे यशस्वी होतील. आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल.
मिथुनः
आज तुम्ही अस्वस्थ व्हाल. व्यवसाय नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. मोठ्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताण-तणावात्मक राहील. उद्योग धंद्यात लक्ष कमी होईल. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा.
कर्कः
आज यश मिळेल. कामे लवकर होतील. प्रसिद्धीचे योग येतील. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
सिंहः
आज अचानक खर्च करावा लागेल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत. परदेशी जाण्याचे योग येतील. उत्पन्नात वाढ होईल परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.
कन्याः
आज नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. अस्वस्थता वाढेल. थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. अपेक्षित कार्य पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे.
तूळ:
आज कामाचा दर्जा सुधारून टाकाल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. उत्तमोत्तम खरेदी कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत.
वृश्चिकः
आज कामात यश मिळेल. खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. भाग्याची साथ चांगली मिळेल. लाबंच्या प्रवासाचे योग येतील. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. इच्छित नोकरी मिळेल.
धनुः
आज संततीच्या बाबतीत दोन पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल. इथे सुवर्णमध्य काढावा लागेल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. आपले आरोग्यही जपा. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
मकरः
आज वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. त्यामुळे थोडी शांतता मिळेल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. अपेक्षित यश संपादन करता येईल. आर्थिक आवक वाढेल. गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. अर्थिक व्यवहार करताना गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये.
कुंभः
आज घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. व्यवसायात परिस्थितीचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा. आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहील. कर्ज फेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम राहील. थोडा तापट स्वभाव सगळ्यावर पाणी पाडू शकतो.