(3 / 13)वृषभ: आज आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल. प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. घरातील लोकांच्या अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल. चिडचिड होईल. मानसिक क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे.