Today Horoscope 24 June 2024 : ऐंद्र योग आणि वणिज करण राहील. गुरू आणि हर्षलशी नवमपंचम योग घटीत होत असून, कसा राहील सोमवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेषः
आज मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. अशावेळी शांत राहणे श्रेयस्कर ठरेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद होतील. व्यापार रोजगारात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वादविवाद टाळा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा.
वृषभ:
आज लाभदायक दिवस आहे. कामाचा दर्जा सुधारेल. व्यवसायात आपल्या मतांवर ठाम रहाणार आहात. कामाचीगती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. प्रकृतीची काळजी घ्या.
मिथुन:
आज निष्काळजी पणा अंगलट येण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेली गुंतवणूक धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. भावंडांशी वाद संभवतात. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मानसिक दृष्टीकोनातून तणाव जाणवेल. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. स्वास्थ सांभाळा.
कर्क:
आज कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. समाधानकारक दिनमान असेल. धाडसी निर्णय घ्याल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. परदेशगमनाचे योग आहेत. आनंदी व ऊत्साही राहाल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. संततीकडून शुभ संदेश मिळतील.
सिंह:
आज तोट्याचे प्रमाण वाढेल. अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. पदप्राप्ती मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. मित्रमंडळींचे व कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभणार आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल.
कन्या:
आज घरातील वातावरणही आनंदी राहील. व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे.
तूळ:
आज व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. जुनी येणी वसूल होतील. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. खरेदी करण्याचा मूड राहील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील.
वृश्चिक:
आज व्यवहार काळजीपूर्वक करा. जोखीम घेण्याचे टाळावे. अविचाराने कर्ज काढू नका. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यापारानिमित्त प्रवास होईल. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल.
धनु:
आज प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. कलाकारांना चांगला वाव मिळेल. लोकांची दाद चांगली मिळेल. आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.
मकरः
आज दिवस त्रासदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहील. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक कराल. धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा.
कुंभ:
आज भावंडे मदत करतील. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. मानधनात वाढ होईल. मान सन्मान पदवी पुरस्कार मिळेल. व्यापारात आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. इच्छे प्रमाणे कार्य घडतील.
मीन:
आज जुनी येणी वसुल होतील. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. परदेशगमन खूप फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक बाबतीत मात्र पैसा जास्त खर्च होणार आहे. प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो.