Marathi Horoscope Today 23 November 2024 : आज २३ नोव्हेंबर २०२४ रोजी, कार्तिक कृष्ण अष्टमी तिथी असून, चंद्र सिंह राशीतुन भ्रमण करत आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी शनिवारचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
(1 / 13)
Today Horoscope 23 November 2024 In Marathi : आज ऐंद्र योग आणि बालव करण राहील. आज कार्तिक कृष्ण अष्टमी तिथी असून,चंद्र सिंह राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा शनिवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
(2 / 13)
मेष : या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना धर्मादाय कार्यात सहभागी व्हावे लागेल. एखादा नवीन मित्र तुमच्या घरी येऊ शकतो. मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला तुमच्या वडिलांच्या एखाद्या गोष्टी बद्दल वाईट वाटेल. तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि समर्पणाने खूप काही मिळवू शकता.
(3 / 13)
वृषभ : आपल्या आवडीची एखादी गोष्ट गमावल्यास ती परत मिळवू शकता. जर तुम्हाला एखाद्या गरजूव्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली तर ती करा. आपण आपल्या घरात काही नवीन विद्युत उपकरणे आणू शकता. दूरच्या कुटुंबातील सदस्याला भेटायला जाऊ शकता.
(4 / 13)
मिथुन : वैयक्तिक जीवनात भरपूर आनंद मिळेल. वाहनांचा वापर काळजीपूर्वक करावा लागेल, अन्यथा वाहन अचानक बिघडल्याने तुमचा आर्थिक खर्च वाढू शकतो. प्रेम आणि पाठिंब्याची भावना लक्षात राहील. इकडे तिकडे बसून वेळ वाया घालवणं टाळलं पाहिजे आणि कोणाकडूनही ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.
(5 / 13)
कर्क : कोणतेही काम केल्यास यश नक्कीच मिळेल. आई तुमच्यासाठी सरप्राईज गिफ्ट घेऊन येऊ शकते आणि कौटुंबिक जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये काही छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होण्याची शक्यता आहे.
(6 / 13)
सिंह : वडिलोपार्जित मालमत्तेचा वाद असेल तर तोही निकाली निघेल. आपल्या घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे वातावरण प्रसन्न राहील. एकापाठोपाठ एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. जर तुम्हाला कोणत्याही कामासाठी काही अडचण येत असेल तर तुम्ही त्यासाठी बाहेर पडणार, तरच ते पूर्ण होईल.
(7 / 13)
कन्या : एखादी चांगली बातमी ऐकल्यास आश्चर्यचकित होऊ नये. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. सासू-सासऱ्यांसोबतच्या नात्यात काही कटुता आली तर तीही दूर होईल. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकू येईल.
(8 / 13)
तूळ : ज्या व्यक्तिला आपल्या मुलांची चिंता असेल तर तो आज मोठी गुंतवणूक करू शकतो. शेअर बाजाराशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. बंधू-भगिनींकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला कामासंदर्भात परस्पर सल्ला घ्यावा लागू शकतो.
(9 / 13)
वृश्चिक : कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. धर्मादाय कार्यातही तुम्हाला खूप रस असेल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास तुमचे नुकसान होईल. कुटुंबातील सदस्यांसमवेत चांगल्या भजनाचा आनंद घ्याल. तुम्हाला खूप इंटरेस्ट असेल. मुलाची प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल.
(10 / 13)
धनु : जोडीदाराच्या काही कामात चढ-उतार येतील. नवीन नोकरी मिळाल्याने कुटुंबातील एखाद्या सदस्याला घरापासून दूर जावे लागू शकते. काही महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायात तुमच्या योजना फलदायी ठरतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आठवणींनी तुम्हाला पछाडले असेल.
(11 / 13)
मकर : भेटवस्तू मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. व्यवसायात चांगला फायदा होईल. काही मित्रांसोबत सावध गिरी बाळगण्याची गरज आहे. कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाचे आयोजन केल्याने वातावरण प्रसन्न राहील. सहकाऱ्यांबद्दल वाईट वाटेल. आर्थिक लाभ मिळाल्यास तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही.
(12 / 13)
कुंभ : कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवा. जोडीदारासोबत कामाबद्दल राग येत असेल तर त्यात वाढ होऊ शकते, त्यामुळे जर तुम्ही काही विनंती केली तर ती जोडीदाराने पूर्ण करायलाच हवी. तुम्हाला काही शारिरीक समस्या उद्भवू शकतात. अतिउत्साही होऊन कोणतेही काम करणे टाळावे लागेल.
(13 / 13)
मीन : तुमच्या कामात काही अडथळे येऊ शकतात. कुटुंबातील मोठ्या सदस्यांकडून भरपूर सहकार्य आणि सहवास मिळेल. आपल्या विचारआणि समजूतदारपणाने सर्व कामे पूर्ण होतील आणि प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून एखादी चांगली बातमी ऐकली तर ती विचारपूर्वकच इतरांना सांगा.