Astrology prediction today 23 August 2024 : आज २३ ऑगस्ट २०२४ रोजी, तीसरा श्रावण शुक्रवार आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
(1 / 13)
Today Horoscope 23 August 2024 : शुल व गंड योग आणि कौलव करण असून, आज श्रावण चतुर्थी आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा जरा-जिवंतिका पूजनाचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
(2 / 13)
मेषः आज कामकाजामुळे अडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी व्यवसायात धाडस दाखवाल. वेगवेगळ्या संधी चालून येतील. व्यापारात नवीन कार्याची योजना आखाल. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढेल. आर्थिक आवक वाढणार आहे.
(3 / 13)
वृषभ: आज मनावर नियंत्रण ठेवा. चांगली कामे मिळतील. वाहवा मिळवाल. तुमची बौद्धीक आणि मानसिक उन्नती होईल. नावलौकिक मिळेल. रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभेल. व्यवहारात सावधपणा बाळगा. आर्थिक बळ कमी पडल्याने योजना अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल.
(4 / 13)
मिथुन: आज वेगवेगळ्या संधी मिळतील. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील. कामात उत्साह वाढेल. जबाबदारीत वाढ होईल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमत्ता संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील.
(5 / 13)
कर्क : जमिनीशी संबंधित कामात गुंतलेल्या लोकांना विशेष यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन लोकांचे सहकार्य आणि सहवास मिळेल. कठोर परिश्रमानंतर काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांशी विनाकारण वाद होऊ शकतात. तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात मेहनत करूनही अपेक्षित यश न मिळाल्याने तुम्ही नाराज असाल.
(6 / 13)
सिंहः आज मौजमजा करण्याकडे कल राहील. वाद विवाद टाळावेत. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. परदेश भ्रमण घडेल. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायात अचानक फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिकतेकडे जास्त कल राहील. आत्मविश्वासात वाढ झाल्याने कोणतेही काम सहजतेने करु शकाल.
(7 / 13)
कन्या: आज वाद-विवाद टाळा. तरुणांना प्रेमात पडावेसे वाटेल पण ते व्यक्त करण्याचे धाडस गोळा करावे लागेल. थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल. व्यापारात नोकरीत रागावर नियंत्रण ठेवा. संयम बाळगुन काम करा. अन्यथा हानी संभवते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद निर्माण होतील. नवीन खरेदीत पैसे खर्च होतील. व्यापारात प्रसिद्धी आणि यश मिळयाची शक्यता आहे.
(8 / 13)
तूळ: आज नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली जाईल. पैसा खर्च कराल. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग करून अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. कामकाजामध्ये वाढ होईल. विचाराअंतीच काळजीपूर्वक निर्णय घ्या. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल.
(9 / 13)
वृश्चिकःआज जवळच्या लोकांची मने दुखावली जातील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. व्यवसायात जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीत बदल करण्याच्या संधी वा मुलाखती लांबणीवर पडतील. कौटुंबिक पातळीवर कुटुंबातील सदस्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात आर्थिक नियोजानावर सावधानीपूर्वक निर्णय घ्या. मुलाची चिंता सतावेल. दुरवरचे प्रवास टाळावेत.
(10 / 13)
धनुःआज घरामध्ये छोट्या समारंभाच्या निमित्ताने प्रियजनांची गाठभेट होईल. उद्योग व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लाभ होतील. आत्मविश्वास वाढीस लागल्याने कठीण पेचप्रसंगावर सहज मात कराल. रोजगारात स्वतःचे निर्णय महत्वपूर्ण राहतील. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. दुसऱ्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. व्यवसायात बरीच उलाढाल कराल.
(11 / 13)
मकरःआज कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. खर्चामुळे चिंतीत राहाल. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्या. वाहन सावकाश सांभाळुन चालवा. अपघात भय संभवते. नोकरीमध्ये कोणावरही अवलंबून राहू नये. स्वत:ची कामे स्वतः करावीत. रोजगारात विपरित प्रसंग घडतील. मनात नैराश्य निर्माण होईल. विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे करण्याचा प्रयत्न करा.
(12 / 13)
कुंभः आज विचारपूर्वक कामे केली तर आजचा दिवस चांगला जाईल. इतराच्या सहयोगाने कामात यश येईल. आपले विचार योग्य ठेवा. नोकरी रोजगारात प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. भक्तिमार्गाकडे वळाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. नोकरीत प्रगती होण्याचे संकेत मिळतील. कुटुंबातील सदस्याची प्रगती होईल.
(13 / 13)
मीनः आज वातावरण उत्साहवर्धक राहील. आर्थिक आवक चांगली राहील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून आपल्या कामाचे कौतुक होईल.