Today Horoscope 22 June 2024 : आज चंद्राचा रवि, बुध आणि शुक्राशी प्रतियोग घटीत असुन बुद्धादित्ययोगात, कसा असेल शनिवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेषः
आज मालमत्तासंबंधी प्रश्न मार्गी लागतील. घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष रहातील. आचरण उत्तम राहिल्यामुळे नावलौकिकता वाढेल. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. वैवाहिक जोडीदाराला कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील.
वृषभः
आज आर्थिक स्थिती समाधानकारक झाल्यामुळे निवांत रहाल. मोठे प्रवासाचे योग येतील. कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्री तपासणी काळजी पूर्वक करा.
मिथुनः
आज नवीन कल्पनांचे स्वागत होईल. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. खेळाडूंना अपेक्षित संपादन करता येईल. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. अचानक खर्च करावा लागेल.
कर्कः
आज नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. ग्रहांची अनुकूलता लाभेल. व्यापार करणाऱ्यांना कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन आव्हानं स्वीकारावी लागतील.
सिंहः
आज आरोग्यही जपा. मतभेद होण्याची शक्यता आहे. अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. काही मनस्ताप देण्यासारख्या घटना अनुभवास येतील.
कन्याः
आज मुलांच्या करिअर संबंधी आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील. स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. नव्या योजनावर काळजी पूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे.
तूळ:
आज उत्साह वाढेल. फायदेशीर व्यवहार करता येतील. कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. गुंतवणूक करताना विचार पूर्वक करणे गरजेचे राहील.
वृश्चिकः
आज बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. मनात नसताना प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. लाभ उठवाल. आर्थिकदृष्या लाभ होईल.
धनुः
आज कर्जफेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील.
मकरः
आज काळजीपूर्वक हाताळा. काळजी घ्यावी लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. उद्योगधंद्यात लक्ष कमी होईल. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे.
कुंभः
आज कार्यक्षेत्रात फायदा होईल. मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कामात यश मिळेल. नावलौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा.