Today Horoscope 22 July 2024 : आज प्रीती योग व तैतील करणात कसा जाईल आजचा सोमवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेष:
आज आकस्मिक लाभ होतील. आपल्या वाणीचा प्रभाव इतरावर पडेल. मनस्वास्थ उत्तम राहील. भाग्यकारक घटना घडतील. नशिबाची साथ चांगली मिळेल. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील.
वृषभ:
आज संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. घरात जवळच्या माणसांचे उत्तम सहकार्य मिळेल. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील.
मिथुन:
आज प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. संताप आणि चिडचिड निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण करावं लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. रागावर नियंत्रण ठेवा. नकारात्मक गोष्टींना तोंड द्या. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. कुटुंबापासुन दुर जाल. मोठी गुंतवणूक आज करू नये.
कर्क:
आज कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. मन प्रसन्न राहील. आर्थिक स्त्रोत वाढतील. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबात मंगल कार्य घडतील.
सिंह:
आज मनातील संयशावृती वाढेल. कडक बोलण्यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावतील. कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा.
कन्या:
आज प्रीती योगात आपणास आर्थिक लाभ होईल. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. बौद्धीक गोष्टींकडे ओढ राहील. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. यश निश्चित लाभेल. आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील.
तूळ:
आज उत्साह वाढेल. बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक बाबतीमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल.
वृश्चिक:
आज कुटुंबातील नातेवाईकांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे त्रस्त व्हाल. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. आरोग्याकडे लक्ष द्या. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत.
धनुः
आज सकारात्मकता वाढेल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. आर्थिक सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. धनवृद्धी होईल.
मकर:
आज दिवस उत्तम राहील. आपला आत्मविशास वाढेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल. मित्रमैत्रिणी नातेवाईका कडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील.
कुंभ:
आज आनंदी राहाल. मोठ्या लोकांशी पटणार नाही. कामाची जबाबदारी मिळेल. बढतीची संधी आहे. कौटुंबिक जिवन आनंदी राहील. प्रेमप्रकरणात यश लाभेल. जमीन खरेदी-विक्रीतून अधिक लाभ होईल. शिक्षक वर्गाचा मान-सम्मान वाढेल. यशाचा दिवस आहे. मानधनात वाढ होईल.