Astrology prediction today 22 August 2024 : आज २२ ऑगस्ट २०२४ रोजी, तीसरा श्रावण गुरुवार आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
(1 / 13)
Today Horoscope 22 August 2024 : धृती योग व बव करण असून, आज श्रावण संकष्ट चतुर्थी आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा बृहस्पती पूजनाचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
(2 / 13)
मेषः आज आरोग्य जपा. मतभेद होण्याची शक्यता आहे. नियोजन आणि शिस्तीची फारकत होतील. आर्थिक बाबतीत अडचणीतून मार्ग काढावा लागेल. मानसिक भिती वाटेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रकृतिकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
(3 / 13)
वृषभः आज उत्साह वाढेल. फायदेशीर व्यवहार करता येतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. कामाचा लाभ निश्चित मिळणार आहे. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. अपेक्षित यश संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. गुंतवणूक विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. सांभाळून राहा.
(4 / 13)
मिथुनः आज व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. तब्येत चांगली ठेवा. गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. आर्थिकदृष्या लाभ होईल.
(5 / 13)
कर्कः आज जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. गायन कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर राहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. कुटुंबातील वातावरण समाधानी राहील.
(6 / 13)
सिंहः आज कर्जप्रकरण काळजीपूर्वक हाताळा. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणावात्मक राहील. व्यवसायिकांचे उद्योगधंद्यात लक्ष कमी होईल. व्यापारात आर्थिक समस्या होऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. मनस्ताप होणाऱ्या घटना टाळणं गरजेचं आहे.
(7 / 13)
कन्याः आज घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष रहातील. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. बृहस्पती पुजनाचा योग विशेष लाभदायक ठरणार आहे.
(8 / 13)
तूळ: आज मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. नावलौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल.
(9 / 13)
वृश्चिकः आज संततीकडून सर्वदृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. मोठे प्रवासाचे योग येतील. कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्री तपासणी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. नवनविन संधी मिळणार आहे.
(10 / 13)
धनुः आज फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. नवीन वस्तूंची खरेदी कराल. मुलांच्या करिअर संबंधी आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील. कुटुंबात तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. नवीन मित्र परिवार जोडला जाईल.
(11 / 13)
मकरः आज नवीन कल्पनांचे स्वागत होईल. कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यशाचा आनंद मिळणार आहे. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. अचानक खर्च करावा लागेल.
(12 / 13)
कुंभः आज अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. कसरत करावी लागेल. तुमच्या वागण्या बोलण्यात तफावत दिसल्यामुळे घरचे लोक तुम्हाला जाब विचारतील. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. कामाचा व्याप वाढणार आहे.
(13 / 13)
मीनः आज वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. कामाचा वेग कमी होईल. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. व्यवसाय वृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. जुनी येणी अचानक वसूल होतील. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे.