Astrology prediction today 20 October 2024 : आज २० ऑक्टोबर २०२४ रोजी, संकष्ट चतुर्थी असून, चंद्र वृषभ राशीतुन भ्रमण करत आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी रविवारचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
(1 / 13)
Today Horoscope 20 October 2024 : आज व्यतिपात योग व बव करण राहील. आज संकष्ट चतुर्थी असून, चंद्र वृषभ राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा रविवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
(2 / 13)
मेष: आज गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. घरच्या समस्यांकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. प्रेमप्रकरणात त्रास होतील. व्यवहार जपुन करावेत. अन्यथा अडचणी वाढतील. आजाराकडे दुर्लक्ष करू नये.
(3 / 13)
वृषभ: आज अपेक्षांचे ओझे सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. अचानक धनप्राप्तीचे उत्तम संयोग निर्माण करेल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. मनात उत्साह राहील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. आज नवनवीन प्रोजेक्टसाठी अनुकूल दिनमान राहील.
(4 / 13)
मिथुनः आज दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये. गुणवैशिष्ट्या मुळे पुरेपूर फायदा होईल. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. मन प्रसन्न राहील. प्रगतीकारक दिनमान आहे. रागावर नियंत्रण ठेवा.
(5 / 13)
कर्क: आज थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या. परदेशात प्रवास घडुन येतील. मानसिक चिडचिड दगदग होईल. विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे. मानसिक क्लेशातून त्रासातुन जावे लागणार आहे. अनैतिक कामापासुन दूर राहा. आरोग्याकडे लक्ष द्या.
(6 / 13)
सिंह: आज आर्थिक गुंतवणूक कराल. धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मनोरंजन करण्याकडेही कल राहील. धंद्यात नवीन ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आपले मनोबल आत्मविश्वास उंचावलेला असेल. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल.
(7 / 13)
कन्याः आज अभ्यासात प्रगती करून घेता येईल. अडलेली कामे मार्गी लागतील. परदेश गमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नविन संधी प्रस्ताव येतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. घाईगडीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील.
(8 / 13)
तूळ: आज आर्थिक बाबतीत अनुकुलता असणार आहे. भरपूर कष्टाची आहुती द्यावी लागेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. परदेशगमनाच्या संधी येतील. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहील.
(9 / 13)
वृश्चिक: आज कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. गैरसमजाला तोंडही द्यावे लागेल. तुमच्या नवीन कल्पनांच स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल.
(10 / 13)
धनु: आज निराशा पदरात पडेल. परंतु आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. अपेक्षित यश संपादन करता येईल. दिवस शुभ लाभदायी असणार आहे. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे.
(11 / 13)
मकर: आज तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. क्लेश वाढेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या कामाचे चिज होणार नाही. आर्थिक हानीची शक्यता आहे. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. जुनी येणी उधारी वसुलीत व्यवसायिकांना खडतर परिस्थितीशी सामना करावा लागेल.
(12 / 13)
कुंभः आज मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील. उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. कोणतेही व्यसन ताब्यात ठेवले नाही तर प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. निर्णय विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल.
(13 / 13)
मीन: आज बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत. व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.