Today Horoscope 20 August 2024 : अतिगंड योग आणि बालव करण असून, आज श्रावणाचा तीसरा मंगळवार आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेषः
आज तापटपणा वाढेल. अविचार महागात पडेल. अवघड जाईल. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद होतील. व्यापार रोजगारात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वादविवाद टाळा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. काळजीपूर्वक करा.
वृषभ:
आज आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. कामाचा दर्जा सुधारेल. व्यवसायात आपल्या मतांवर ठाम रहाणार आहात. कामाचीगती वाढवण्यासाठी याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. मोठा आर्थिक लाभ होईल. प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदाराचे नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे.
मिथुन:
आज आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. पूर्वी केलेली गुंतवणूक धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. भावंडांशी वाद संभवतात. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मानसिक दृष्टीकोनातून तणाव जाणवेल. अडचणीत आणणारा दिवस आहे. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा.
कर्क:
आज धाडसी निर्णय घ्याल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. सहकार्य लाभेल. परदेशगमनाचे योग आहेत. व्यापारीवर्गाला आर्थिक फायद्याचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही राहाल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. उत्तम दिनमान आहे.
सिंह:
आज तोट्याचे प्रमाण वाढेल. यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. मोठी पदप्राप्ती मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. सहकार्य लाभणार आहे.
कन्या:
आज प्रयत्न यशस्वी ठरतील. घरातील वातावरणही आनंदी राहील. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागू शकतो. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक पाठबळ चांगले मिळेल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन लाभेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे.
तूळ:
आज समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. जुनी येणी वसूल होतील. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील.
वृश्चिक:
आज आर्थिक बाबतीत व्यवहार काळजीपूर्वक करा. मोठी जोखीम घेण्याचे टाळावे. अविचाराने कर्ज काढू नका. हप्ते फेडताना त्रास होईल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागू शकतात. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल.
धनु:
आज व्यक्तिमत्वात वाढ होईल. कलाकारांना चांगला वाव मिळेल. आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.
मकरः
आज कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहील. मनःस्तापाचे प्रसंग येतील. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक कराल. भांडण वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. आशावादी दृष्टीकोनातून सतत विचार करावा. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे.
कुंभ:
आज मनाला समाधान लाभेल. भावंडे मदत करतील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. मानधनात वाढ होईल. मान सन्मान पदवी पुरस्कार मिळेल. व्यापारात आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे.
मीन:
आज मन प्रसन्न राहील. मानसिक तयारी ठेवावी लागेल. प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आध्यात्मिक सुख उत्तम मिळेल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. जुनी येणी वसूल होतील.