Astrology prediction today 2 September 2024 : आज २ सप्टेंबर २०२४ रोजी, शेवटचा श्रावण सोमवार आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
(1 / 13)
Today Horoscope 2 September 2024 : आज शुभ शिव योग आणि चतुष्पाद करण असून, आज श्रावण अमावस्या आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा शेवटचा श्रावण सोमवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
(2 / 13)
मेषः आज व्यापारात लाभ होईल. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. अनुकूल वातावरण निर्माण होईल. जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. शासकीय नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल.
(3 / 13)
वृषभ: आज यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. भाग्याची साथ चांगली मिळेल. कार्यक्षेत्रात भरभराट होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. दुसर्याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील.
(4 / 13)
मिथुन: आज मानसिक त्रास उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. आर्थिक हानी होण्याची संभवना आहे. प्रवासाच्या संधी मिळतील. घरात पाहिजे तेवढे लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांचीच चिडचिड होईल. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. फसगत होईल.
(5 / 13)
कर्क: आज प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्य उत्तम राहील.
(6 / 13)
सिंह: आज कष्टाचे चीज होईल. मुलाखतीत यश मिळेल. तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. रोजगारात संतोष जनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कामातून उत्तम मोबदला मिळू शकतो.
(7 / 13)
कन्याः आज अडलेली कामे मार्गी लागतील. ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रसिद्धीचे योग येतील. एखादी गोष्ट भाग्यात असली तर मिळते याचा प्रत्यय येईल. आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल.
(8 / 13)
तूळ: आज अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले होईल. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. मनावरचा ताण वाढेल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास सांभाळून करा.
(9 / 13)
वृश्चिकः आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा टाळावा. कामे पूर्ण होतील. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. आज भरभरटीचा दिवस आहे.
(10 / 13)
धनु: आज कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. घरातील खर्च अपरिहार्य कारणामुळे वाढतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहील. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे.
(11 / 13)
मकर: आज शासकीय कामकाजातून यश मिळेल. लेखक कलावंतांना संधी मिळतील. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. संततीसंबंधी तुमचे विचार वेगळे असतील परंतु तुमच्या मताशी मुलं सहमत होतीलच असे नाही. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. व्यवसायातून जुनी येणी वसूल होईल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल.
(12 / 13)
कुंभ: आज उच्च शिक्षण घेणाऱ्यांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
(13 / 13)
मीन: आज आरोग्याची काळजी घ्या. विचार पूर्वक निर्णय घ्या. ताणतणाव जाणवेल. यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहील. खर्च मात्र विचार करून करा. मान सन्मान मिळेल.