Today Horoscope 2 August 2024 : हर्षण योग आणि विष्टी करण राहील. आज मासिक शिवरात्री व्रत असून, योग-संयोगात कसा जाईल आजचा शुक्रवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेषः
आज आकस्मिक धनलाभ संभवतो. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. चांगल्या संधी मिळतील. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वाद विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका.
वृषभः
आज बराच पैसा खर्च कराल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. भावंडांची मदत मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल.
मिथुनः
आज मानसिक त्रास जाणवेल. वैवाहिक जीवनात थोडी तडजोड करावी लागेल. भावंडांशी मतभेद संभवतात. तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. व्यापारात फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल.
कर्कः
आज चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल.
सिंहः
आज दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध वास्तवाशी लावण्याचा प्रयत्न करू नये. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
कन्याः
आज आरोग्याबाबतीत खर्च वाढतील. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळा. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकारवृत्ती मुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही.
तूळ:
आज कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.
वृश्चिकः
आज आनंदी वातावरण लाभेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. तुम्हाला चैन पडणार नाही. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील.
धनुः
आज कामात यशस्वी व्हाल. परंतु एकंदरीत यशाकडेच वाटचाल राहील. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल.
मकर:
आज नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. सहकाऱ्यांसोबतचे वाढविवाद मात्र टाळावे. मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
कुंभ:
आज प्रसिद्धी मिळवाल. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. इच्छेप्रमाणे कार्य घडतील. जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा.
मीनः
आज आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील. धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.