Today Horoscope 19 September 2024 : आज वृद्धी योग व तैतील करण राहील. आज भाद्रपद द्वितीया तिथी आहे, चंद्र मीन राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा गुरुवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेषः
आज करिअरची गती काहीशी कमी होतांना दिसेल. नोकरीत नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागेल. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. धनवृद्धी होईल.
वृषभ:
आज नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. तुमची स्थिती उत्तम होईल. मनातील संयशी वृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा. नोकरी बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा.
मिथुन:
आज आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. धन संचय करा. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. यश निश्चित लाभेल. आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल.
कर्क:
आज नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. कलाकाराचा मान सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. कौटुंबिक जीवनात सुख आणि समृद्धी लाभेल. आकस्मिक लाभ होतील.
सिंह:
आज उत्तम दिवस राहील. आर्थिक लाभ होतील. बढतीचे योग आहेत. आत्मविश्वास वाढीस लागेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. जोडीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील.
कन्या:
आज आर्थिक स्थिती उत्तम होईल. कुटुंबामधून सुवर्ता मिळणार आहे. अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडाल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल.
तूळ:
आज अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. आरोग्याची काळजी घ्या. योग व व्यायामात सातत्य ठेवा. आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चंचलपणावर आवर घाला. आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याबाबत काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक:
आज अनुकूल काळ आहे. ठोस निर्णय घेऊ शकाल. अडखळल्यासारखे होईल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांमध्ये फरक जाणवेल. नोकरीत व्यापारात आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. दिवस आनंददायी आहे. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. यश संपादनाची संधी मिळेल. पद प्रतिष्ठा लाभेल. तुमची पदोन्नती व प्रगती होईल.
धनु:
आज नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक कार्य घडतील. कामाची पद्धत बदलावी लागेल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक स्त्रोत वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. वैवाहीक जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते.
मकर:
आज कामांना गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे. कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळा. अडचणी येऊ शकतात. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. आर्थिक व्यवहार टाळावेत. प्रकृतीकडे लक्ष द्या. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत.
कुंभ:
आज वाद-विवाद होतील. देवाण घेवाणीपूर्वी कागदपत्रे वाचा. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहील. कुटुंबापासुन दुर जाल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिण नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा. प्रकृती वर लक्ष द्या.
मीन:
आज ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. विवाह जुळतील. भावंडाची योग्य साथ मिळेल. नविन संधी मिळणार आहे. सौभाग्य योगात वृद्धी होईल. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल.