Today Horoscope 19 October 2024 : आज वज्र योग व तैतील करण राहील. आज गजकेसरीयोग घटित होत असून, चंद्र मेष राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा शुक्रवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेष:
आज दिवस चांगला ठरू शकतो. विरोधकही शांत होतील. परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी इच्छुक असलेल्यांनी प्रयत्न करावेत. राजकारणात काम करणाऱ्यांना यश मिळेल. नशीबाचे पाठबळ लाभणार आहे. नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. बढती व बदलीसाठी उत्तम दिवस आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दुरचे प्रवास घडतील. आहारावर नियंत्रण ठेवा. मानधनात वाढ होईल.
वृषभ:
आज काळजी घ्यावी लागेल. अतिरिक्त खर्च टाळावा. मौल्यवान वेळ वाया घालवू नये. काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात. दिनचर्येत ध्यान योगा आणि व्यायामाचा समावेश अवश्य करावा. मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल.
मिथुन:
आज कोणतीही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. परदेशात नोकरी करण्यास किंवा अभ्यास करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी किंवा कार्यरत व्यावसायिकांसाठी अनेक संधी निर्माण होऊ शकतात. प्रॉपर्टीच्या कामात यश मिळू शकते. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. शुभवार्ता ऐकायला मिळेल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. यश निश्चित लाभेल.
कर्कः
आज आरोग्य उत्तम राहील. नेतृत्वगुण विकसित होईल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचा जुना वादही मिटू शकतो. यश मिळवावे. विरोधकांवर मात कराल. नवीन प्रकल्पांमध्ये सहज व्यवहार करू शकाल. कौटुंबिक जीवन खूप चांगले ठेवाल. प्रशंसा होईल. बढती व वेतनवाढीचा योग आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
सिंहः
आज रोजगारात विपरित प्रसंग घडतील. आर्थिक दृष्टीकोनातून समस्या निर्माण होतील. दुर्व्यसनांपासून सावध राहा. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्यावे. आर्थिक टंचाई निर्माण होतील. मनात नैराश्य निर्माण होईल. विचारपूर्वक निर्णय घ्या. संयमाने कामे करण्याचा प्रयत्न करा. खर्चामुळे चिंतीत राहाल. नवीन संधीचा योग आहे. प्रवासातून लाभ होणार नाही. प्रवास निरर्थक ठरतील. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात.
कन्या:
आज नवीन संधी मिळतील. कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षेप्रमाणे यश येईल. भरपूर सहकार्य मिळेल. नवीन कार किंवा घर घेण्याचे धैर्य वाढवू शकाल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. दिवसभर मन प्रसन्न राहील. व्यापार उद्योगात फायदा होईल. खर्च मात्र विचार करून करा. मान सन्मानात वाढ होईल.
तूळ:
आज कोणत्याही परीक्षेत यश मिळवू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादही मिटतील. पैसे चांगल्या कामांवर खर्च कराल. नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल. कर्मावर विश्वास ठेवा. कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. उत्तम सहकार्य लाभेल. मानसन्मान मिळेल. आर्थिक लाभ होतील. उन्नतीकारक दिवस आहे. एकंदरित शुभ फलदायी दिवस राहील. आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक:
आज भरपूर आर्थिक लाभ होईल. घरामध्ये चांगले वातावरण असेल. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सन्मान आणि लाभ मिळेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. धनलाभाचा दिवस आहे. समाजात आपली मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. व्यापारात आकस्मिक लाभाचा योग आहे. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल.
धनुः
आज वैवाहिक जीवनाबद्दल थोडे सावध राहावे लागेल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत वाढवण्यासाठी कठोर परिश्रम कराल आणि त्याचे फायदे देखील मिळतील. गोड बोलण्याने बरीच कामे मार्गी लावता येतील. वादविवाद टाळा. मोठी आर्थिक फसवणुक होण्याचे योगआहे. लक्ष्मीची अवकृपा राहील. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. विशेष काळजी घ्या. जोडीदाराशी स्नेहपुर्वक वागा. मनावर नियंत्रण ठेवा, चिंता वाढेल.
मकर:
आज व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. आठवण येत असलेल्या पूर्वीच्या मित्र मैत्रिणींच्या आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. दिनमान अनुकुल राहील. आर्थिक लाभ होईल. कामाप्रती सजग राहा. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल.
कुंभ:
आज कौटुंबिक तणाव निर्माण होईल. संयमाने काम करा. सलोख्याने राहा. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वादविवाद होण्याची शक्यता आहे. मनावर संयम ठेवून राहा. काळजी पूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे. मानसिक दृष्टीकोनातून क्लेश उत्पन्न करणार दिनमान आहे. आरोग्याची काळजी घ्या.
मीन:
आज राहिलेली कामे वेळेत पूर्ण कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. पदोन्नती होईल. नविन मित्र भेटतील. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. अपेक्षित यश लाभेल. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. वाहन घर खरेदीस अनुकूल दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील.