Astrology prediction today 19 August 2024 : आज १९ ऑगस्ट २०२४ रोजी, तीसरा श्रावण सोमवार आणि श्रावण पौर्णिमा आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
(1 / 13)
Today Horoscope 19 August 2024 : शोभन योग आणि विष्टी करण असून, आज श्रावण सोमवार आणि श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचा सण आहे, योग-संयोगात कसा जाईल आजचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
(2 / 13)
मेष: आज मेहनत कराल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारी वर्गासाठी बर्याच संधी प्राप्त होतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी राहाल.
(3 / 13)
वृषभः आज खर्चाला अनेक वाटा फुटतील. वाहने जपून चालवा. फायदे तोटे अनुभवास येतील. मानापमानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापासारख्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लाभणार नाही. बडेजावपणा मिरवू नका. प्रकृतीची विशेष काळजी घ्या.
(4 / 13)
मिथुन: आज मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. वेगवेगळ्या संधी येतील. कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल.
(5 / 13)
कर्क: आज मन चिंताग्रस्त राहील. थोडा आळशीपणा कराल. कामे रखडतील. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. यश निश्चित मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. वाईट सवयीचा त्याग करा. मनाची उद्विग्नता वाढेल. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. वादविवाद होण्याची शक्यता आहे.
(6 / 13)
सिंह: आज खर्च वाढेल. मतभेद होण्याची शक्यता आहे. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. वातावरण ताण तणावात्मक राहील. मान अपमानाचे प्रसंग घडतील. यशाचा दिवस आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. महत्वाची कागदोपत्रे मात्र संभाळा.
(7 / 13)
कन्या: आज वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. मनःस्तापाचे प्रसंग येतील. गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असंतोष निर्माण होईल. मोठे व्यवहार टाळावेत. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. असहकार्य लाभेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल.
(8 / 13)
तूळ: आज धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. रोजगारात तुमची प्रगती होईल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यवसायात वृद्धी होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. अधिक लाभ होईल. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. पदोन्नती व प्रगती होईल.
(9 / 13)
वृश्चिकः आज तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल. पैशाची अडकलेली कामे पार पडतील. भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात सावधानी बाळगा. नोकरीत बढतीची संधी आहे. कल्पना शक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा.
(10 / 13)
धनु: आज मनःशांती मिळेल. यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील. नोकरीत आत्म विश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्त्रोत निर्माण होतील. इच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. स्वभावातील रागावर नियंत्रण ठेवा. दिवस यशप्राप्तीचा आहे. मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे.
(11 / 13)
मकरः आज प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. मानसिक अस्थिरता जाणवेल. संतीतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल. करिअर संबंधी चिंतेत पडाल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती टाळा. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. स्पर्धकांवर मात करावी लागेल.
(12 / 13)
कुंभ: आज सहकार्य चांगले मिळणार आहे. आरोग्याबाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होईल.
(13 / 13)
मीनः आज रोजगारात काम करण्यास उत्साह येईल. धनप्राप्तीची शक्यता राहील. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल.