(2 / 13)मेष: आज समस्या दूर होतील. परदेशगमन खूप फायदेशीर ठरणार आहे. प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आध्यात्मिक सुख उत्तम मिळेल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. मान सन्मान मिळेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. मन प्रसन्न राहील.