(3 / 12)वृषभ: आज शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील.