Daily Horoscope 17 October 2024 : खर्चाचा आवाका जपा, या राशींवर लक्ष्मीची अवकृपा होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Daily Horoscope 17 October 2024 : खर्चाचा आवाका जपा, या राशींवर लक्ष्मीची अवकृपा होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 17 October 2024 : खर्चाचा आवाका जपा, या राशींवर लक्ष्मीची अवकृपा होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Daily Horoscope 17 October 2024 : खर्चाचा आवाका जपा, या राशींवर लक्ष्मीची अवकृपा होईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Published Oct 17, 2024 08:13 AM IST
  • twitter
  • twitter
  • Astrology prediction today 17 October 2024 : आज १७ ऑक्टोबर २०२४ रोजी, नवान्न पौर्णिमा असून, चंद्र मीन राशीतुन भ्रमण करत आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Today Horoscope 17 October 2024 : आज हर्षण योग व विष्टि, बालव करण राहील. आज पौर्णिमा आणि कार्तीक स्नानारंभ दिनी, चंद्र मीन राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा गुरूवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
twitterfacebook
share
(1 / 13)

Today Horoscope 17 October 2024 : आज हर्षण योग व विष्टि, बालव करण राहील. आज पौर्णिमा आणि कार्तीक स्नानारंभ दिनी, चंद्र मीन राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा गुरूवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!

मेषः आज मतभेद होऊ शकतात. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. वेळेचा अपव्यय टाळा. आरोग्याची काळजी घ्या. व्यापारात भागीदाराची मदत घ्यावी लागेल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील. वाद टाळणे हितावह होईल. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. 
twitterfacebook
share
(2 / 13)

मेषः 

आज मतभेद होऊ शकतात. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. वेळेचा अपव्यय टाळा. आरोग्याची काळजी घ्या. व्यापारात भागीदाराची मदत घ्यावी लागेल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील. वाद टाळणे हितावह होईल. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. 

वृषभ: आज मनोधैर्य सांभाळा. प्रेमीजनांना प्रेम प्रकरणात अडथळे संभवतात. कामाची गती मंदावेल. निष्काळजीपणा राहील. तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. क्षाणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. संततीकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याने मोठ्या समस्या उद्‌भवतील. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. 
twitterfacebook
share
(3 / 13)

वृषभ: 

आज मनोधैर्य सांभाळा. प्रेमीजनांना प्रेम प्रकरणात अडथळे संभवतात. कामाची गती मंदावेल. निष्काळजीपणा राहील. तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. क्षाणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. संततीकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याने मोठ्या समस्या उद्‌भवतील. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. 

मिथुनः आज हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. सयंमी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. शुभ कार्यात सामील व्हाल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. प्रयत्नाला यश मिळेल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. 
twitterfacebook
share
(4 / 13)

मिथुनः 

आज हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. सयंमी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. शुभ कार्यात सामील व्हाल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. प्रयत्नाला यश मिळेल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. 

कर्क: आज स्वप्नाची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. यशाला खेचून आणाल. कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. रागावर नियंत्रण ठेवा. ध्येयापासून विचलित होऊ नका. तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. आखलेल्या योजना काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. 
twitterfacebook
share
(5 / 13)

कर्क: 

आज स्वप्नाची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. यशाला खेचून आणाल. कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. रागावर नियंत्रण ठेवा. ध्येयापासून विचलित होऊ नका. तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. आखलेल्या योजना काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. 

सिंह: आज नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. कामात कौशल्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. आर्थिक नियोजन करण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही. दूरच्या प्रवासाचे योग येतील. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभणार आहे. 
twitterfacebook
share
(6 / 13)

सिंह: 

आज नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. कामात कौशल्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. आर्थिक नियोजन करण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही. दूरच्या प्रवासाचे योग येतील. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभणार आहे. 

कन्याः आज आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. प्रसिद्धी मिळवाल. बांधकाम रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. खेळाडूसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. इच्छित नोकरी मिळेल. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. 
twitterfacebook
share
(7 / 13)

कन्याः 

आज आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. प्रसिद्धी मिळवाल. बांधकाम रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. खेळाडूसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. इच्छित नोकरी मिळेल. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. 

तूळ:आज आत्मविश्वास द्विगुणित होईल. सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. इच्छित फळ मिळणार आहे. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहील. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.  कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील.
twitterfacebook
share
(8 / 13)

तूळ:

आज आत्मविश्वास द्विगुणित होईल. सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. इच्छित फळ मिळणार आहे. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहील. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.  कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील.

वृश्चिकः आज कोणत्याही मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. महत्वपूर्ण कागदपत्रे मात्र संभाळा. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. दिवस उत्तम राहील. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्य उत्तम राहील. 
twitterfacebook
share
(9 / 13)

वृश्चिकः 

आज कोणत्याही मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. महत्वपूर्ण कागदपत्रे मात्र संभाळा. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. दिवस उत्तम राहील. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्य उत्तम राहील. 

धनुः आज नवीन जबाबदारी मिळेल. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंद अधिकच दुणावेल. व्यापारी वर्गाकरीता महत्वाचा योग आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. नोकरदारांना बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. विचलीत होऊ नका. 
twitterfacebook
share
(10 / 13)

धनुः 

आज नवीन जबाबदारी मिळेल. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंद अधिकच दुणावेल. व्यापारी वर्गाकरीता महत्वाचा योग आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. नोकरदारांना बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. विचलीत होऊ नका. 

मकरः आज योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. प्रेमप्रकरणात गैरसमज त्रासदायक ठरतील. व्यवसायातही काहीसा ताणतणाव राहील. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. कर्ज घेणे आज टाळा. 
twitterfacebook
share
(11 / 13)

मकरः 

आज योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. प्रेमप्रकरणात गैरसमज त्रासदायक ठरतील. व्यवसायातही काहीसा ताणतणाव राहील. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. कर्ज घेणे आज टाळा. 

कुंभः आज सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करा. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. कटकटी निर्माण करणारे योग आहेत. आर्थिक फसवणुकीचे योग आहेत. व्यवहार काळजीपूर्वक करा. विनाकारण वाद घालू नयेत. कलह होण्याची शक्यता राहील. मोठी आर्थिक फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा राहील. काळजीपूर्वक व्यवहार करा. 
twitterfacebook
share
(12 / 13)

कुंभः 

आज सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करा. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. कटकटी निर्माण करणारे योग आहेत. आर्थिक फसवणुकीचे योग आहेत. व्यवहार काळजीपूर्वक करा. विनाकारण वाद घालू नयेत. कलह होण्याची शक्यता राहील. मोठी आर्थिक फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा राहील. काळजीपूर्वक व्यवहार करा. 

मीन: आज मनासारखी कामे होतील. आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. एखाद्या विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. समाधान लाभेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. 
twitterfacebook
share
(13 / 13)

मीन: 

आज मनासारखी कामे होतील. आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. एखाद्या विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. समाधान लाभेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. 

इतर गॅलरीज