मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rashi Bhavishya Today : आज गजकेसरीयगोत सोमवारचा बकरी ईदचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Rashi Bhavishya Today : आज गजकेसरीयगोत सोमवारचा बकरी ईदचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

Jun 17, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • twitter
Rashi Bhavishya Today 17 june 2024 : आज १७ जून २०२४ सोमवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
आज चंद्र तूळ राशीतून संक्रमण करत आहे. तसेच, गुरू आणि हर्शलशी षडाष्टक योग निर्माण होत असुन गजकेसरीयोग घटीत होत आहे. कसा असेल सोमवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
share
(1 / 13)

मेषः आज आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. वाहन खरेदीसाठी शुभ योग आहेत. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासाविषयी जास्त लक्ष घालावे लागेल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढेल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. 
share
(2 / 13)

वृषभः आज जोडीदाराच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत. कुटुंबावर खर्च होईल. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल. 
share
(3 / 13)

मिथुनः आज महत्त्वाची कामे रखडतील. नोकरी व्यवसायात थोडासुद्धा निष्काळजीपणा करू नका तो अंगलट येण्याची शक्यता आहे. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळा. आर्थिक हानी होईल. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. 
share
(4 / 13)

कर्कः आज कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. 
share
(5 / 13)

सिंहः आज आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. उसने पैसे देण्याचे टाळा. कोणाला जामीनही राहू नये. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापटपणा वाढेल. व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. 
share
(6 / 13)

कन्याः आज अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. अडलेली कामे मार्गी लागतील. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. परंतु वेळीच सर्व गोष्टी उघड बोलून वातावरण थंड कराल. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही.  
share
(7 / 13)

तूळ: आज मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील. भरभराटीचा दिवस आहे.
share
(8 / 13)

वृश्चिकः आज घरातील अनेक अडचणी सोडवाल. तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहील. 
share
(9 / 13)

धनुः आज कर्ज घेणे देणे टाळा. काम करण्यात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. 
share
(10 / 13)

मकरः आज दिवस मंगलमय आहे. गृहसौख्यात भर पडेल. प्रेम प्रकरणात यश येईल. वेळीच सावध राहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. किर्ती व मान सन्मान मिळेल. 
share
(11 / 13)

कुंभः आज किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पाहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. 
share
(12 / 13)

मीनः आज अडलेली कामे मार्गी लागतील. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. 
share
(13 / 13)

इतर गॅलरीज