Today Horoscope 16 October 2024 : आज ध्रुव, व्याघात योग व गरज करण राहील. आज पौर्णिमा तिथी असून, चंद्र मीन राशीतून भ्रमण करत आहे. योग-संयोगात कसा जाईल आजचा बुधवारचा दिवस! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेषः
आज आर्थिक लाभ होतील. मनस्वास्थ उत्तम राहील. आनंददायक घटना घडतील. नशिबाची साथ चांगली मिळेल. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. शुभ दिनमान आहे. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे.
वृषभ:
आज दिवस उत्तम राहील. नवीन ओळखी होतील आणि त्याचे रुपांतर प्रेमात होऊ शकेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. कल्पनांना साथीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील.
मिथुनः
आज काम करण्याचा उत्साह वाढेल. बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. कर्ज मंजूर होईल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस शुभ राहील. केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल वाढवणारा दिवस राहील.
कर्क:
आज आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी राहाल. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. बढतीची संधी आहे. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक जिवन आनंदी राहील. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संततीविषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी-विक्रीतून अधिक लाभ होईल. मान-सम्मान वाढेल. मानधनात वाढ होईल.
सिंह:
आज कोर्टकचेरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. मनस्वास्थ सांभाळा. मन स्थिर ठेवा. प्रतिष्ठा धुळीला मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. अपघात दुघर्टना घडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील.
कन्याः
आज दिवस प्रगती कारक आहे. मनात उर्जा आणि सकारात्मकता वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष संधी मिळतील. कामाची गती वाढेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आनंददायक राहील. धनवृद्धी होईल.
तूळ:
आज शुभ दिवस असेल. आर्थिक वाढ होईल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. बढतीचे योग आहेत. पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. विवाह खात्रीशीर जुळतील. संततीकडून समाधान सुख लाभेल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल.
वृश्चिक:
आज प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. संताप आणि चिडचिड निर्माण होईल. खर्चावर नियंत्रण ठेवावं लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. रागावर नियंत्रण ठेवा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिडपणा राहील. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्भवतील. मोठी गुंतवणूक आज करू नये.
धनु:
आज आनंदी दिवस आहे. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाचा दर्जा वाढेल. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. प्रश्न व्यवस्थित हाताळाल. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. वैवाहीक जीवन सुखी राहील. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे.
मकर:
आज मनातील संयशावृती वाढेल. लोकांची मने दुखावतील. विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरी मात्र बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करा. कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल.
कुंभ:
आज आर्थिक लाभ होईल. घरात उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल. आकस्मिक धनलाभ होईल.
मीन:
आज अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना धीराने तोंड द्याल. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. प्रकृतीकडे लक्ष द्या. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत.