आज वरियानयोग घटीत होत असून, गंगा दशमीचा चंद्र कन्या राशीतुन तसेच हस्त नक्षत्रातुन भ्रमण करीत आहे.कसा असेल रविवार! वाचा थोडक्यात राशीभविष्य!
मेषः
आज व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. कामासाठी दिवस मंगलमय आहे. कामकाजात गुप्तता बाळगा. घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. प्रेम प्रकरणात यश येईल.
वृषभः
आज मन प्रसन्न राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. आत्म विश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. मन समाधानी राहील.
मिथुनः
आज वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. थोडा तापटपणाही वाढेल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. नावलौकिक वाढेल. वडिलोपार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. चांगले वातावरण राहील.
कर्कः
आज आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. उसने पैसे देण्याचे टाळावे. तापटपणा वाढेल. मनस्ताप करावा लागेल. व्यवसायिक व्यक्तींनी आज जपुन पाऊल टाकावी लागणार आहेत. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. विचारपूर्वक निर्णय घ्या.
सिंहः
आज व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. काही महत्त्वाची कामे रखडतील. तारेवरची कसरत करावी लागेल. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. कायद्याच्या चौकटीत राहुन कामे करावीत. प्रवास शक्यतो टाळा.
कन्या:
आज विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचीच जास्त संभवना आहे. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
तूळ:
आज जुनी येणी वसूल होतील. मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील. भरभरटीचा दिवस आहे.
वृश्चिकः
आज घरगुती वातावरण चांगले राहील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील.
धनु:
आज कौटुंबिक वातावरण निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. अनिद्रेचा त्रास जाणवेल. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा.
मकरः
आजच्या व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल.व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून, आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक प्रगतीचा दिवस आहे.
कुंभः
आज आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. जोडीदाराच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत. प्रवास लाभदायक ठरेल. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल.
मीनः
आज व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची दक्षता घ्या. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील.